Poladpur Hospital Pudhari
रायगड

Poladpur Hospital: पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रिक्तपदांचे ग्रहण

अद्यावत उपचार प्रणाली गरजेची; आरोग्य यंत्रणेकडे शासनाने लक्ष देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन यंत्रणांसह ऑक्सिजन युनिट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, मात्र अत्याधुनिक सेवा मात्र रुग्णाला मिळत नसल्याने अपघात गस्त रुग्णाला इतर ठिकाणी हलवावे लागत आहे त्यातच रुग्णालयातमधील २८ पैकी १७ पद भरण्यात आली आहेत.

११ पद रिक्त आहेत भरलेल्या पद मध्ये ३ पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे तर वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे १ पद रिक्त आहे. या ठिकाणी १२ सप्टेंबर २५ पासून प्रभारी म्हणून भानुदास गिरी याच्याकडे आहे.

रुग्णालय परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्य गेटसह अन्य दोन ठिकाणी म्हणजे तीन ठिकाणी आग विझविण्यासाठी आणि आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हे बसविण्यात आलेले यंत्र पाण्याच्या टाकीशी जोडण्यात आले असून कितीही लांबपर्यंत पाईप ओढून नेऊन पाण्याचा मारा करता येऊ तसेच आगीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे मात्र ग्रामीण रुग्णालय ला नवी संजीवनी मिळत असताना रुग्णालयामधील रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळणे क्रमप्राप्त बनले आहे. 

पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत व १ नगरपंचायत असलेल्या व सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या पोलादपूर तालुक्यातील आरोग्य सेवा असून नसल्या सारखी आहे. तालुक्यात १ ग्रामीण रुग्णालय आणि २ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मात्र गेली अनेक वर्ष आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे असल्याने ग्रामीण जनतेला सोईसुविधा कोण देणार ? असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. त्यातच तालुक्यातील परसुले येथे तिसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असल्याची मागणी पूर्णत्वास गेली असली तरी उभारणे गरजेचे आहे.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये सद्यस्थिती अंतर रुग्ण व बाह्यरुग्ण कक्ष सुरू असून यासाठी लागणारा औषधसाठा परिपूर्ण असून यासह श्वानदंश सर्पदंश यासाठी अत्यावश्यक असणारी औषधे उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली आहे.  आजही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे असल्याने ती प्रामुख्याने भरणे गरजेचे होते मात्र याकडे आरोग्य यंत्रणेचे होणारे दुर्लक्ष खेदजनक म्हणावे लागेल.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी याची संख्या कमी असताना व त्या रुग्णालयात फक्त प्राथमिक उपचार करत रुग्णाला इतर रुग्णालयात हलविले जाते त्या रुग्णालयात इतर अत्यावश्यक साधन सुविधा मुबलक कर्मचारी पुरविणे गरजेचे होते मात्र त्या कडे दुर्लक्ष करत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात सुमारे ११ लक्ष ९८ हजार खर्च करत ऑडिट करत यंत्रणा उभारण्यात आली होती मात्र रिक्त पद व उपचार प्रणाली अभावी यंत्रणा काय कामाची असा प्रश्न निर्माण होत आहे.

महामार्गावर महाड, पोलादपूर तालुक्यात शासकीय ग्रामीण हॉस्पिटल आणि महाड तालुक्यात ट्रामा केअर हॉस्पीटल अशी दोन शासकिय रूग्णालये असली तरी या रुग्णालयांमध्ये आर्थोपेडीक आणि न्युरो लॉजिस्ट तज्ञ नसल्याने अपघातग्रस्तांना नवी मुंबई मुंबई मधील रुग्णालयात नेतेवेळी तसेच तेथे दाखल केल्यावर वैद्यकिय उपचाराला विलंब झाल्यामुळे काहींना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात २८ मंजूर पदे पैकी ११ पदे रिक्त असल्याने शासनाने सदरची पदे भरणे गरजेचे आहे.

महामार्गावरील हे रुग्णालय असून या परिसरात जवळ कशेडी घाट व आंबेनळी घाट असे दोन घाट असून या घाटांमध्ये सातत्याने अपघात घडत असतात तसेच महामार्गावरही दर दिवस छोटे-मोठे अपघात घडत असतात मात्र या रुग्णालयात एक्स-रे मशिन नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांची हेळसांड होत असून गंभीर रुग्ण असल्यास तात्काळ महाड, माणगाव, मुंबई, पुणे अशा ठिकाणी हलवावे लागतात यासाठी शासनाने या रुग्णालयातील सोयीसुविधा तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

सद्यस्थितीत १०८ व स्थानिक आमदार निधीतून देण्यात आलेली १ रुग्णवाहिका सह इतर 2 रुग्णवाहिका कार्यरत आहे, असे असले तरी आरोग्य विभागात होणारे बदल लक्षात घेता तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मध्ये बदल करत दर्जेदार सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पोलादपूर तालुक्यातील राजिप सभापती पद मिळाले आहे. जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून या भागातून निवडून गेले आहेत त्यांनी या महत्वपूर्ण आरोग्य विषयाकडे लक्ष देत रिक्त पद भरत आरोग्य व्यवस्था बळकट करावी अशी मागणी या भागातून करण्यात येत आहे. 

उपचार प्रणाली अभावी यंत्रणा काय कामाची

या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे पद रिक्त आहे. तर वैद्यकीय अधिकारी पदे वर्ग २ ची ३ मंजूर असून सद्यस्थिती ३ पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत तर अधिपरिचरिक ७ पदे असून६ पदे भरलेली आहेत, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३चे १ पद रिक्त आहे, कनिष्ठ लिपिक वर्ग ३ चे २ पैकी १ रिक्त, आहे, कक्ष सेवक वर्ग ४ चे ४ मंजूर पदे पैकी ४ रिक्त आहेत. शिपाई १ पद रिक्त आहे तर वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ची ३ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. सफाई कामगार २ पैकी २०२३ पासून फक्त एकच कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT