Poladpur Rainfall Pudhari
रायगड

Poladpur Rainfall: नैसर्गिक आपत्तीचे भय कायम; दरडींची टांगती तलवार

मुसळधार पावसात झाडे पडण्याच्या वाढत्‍या घटना; आपत्तीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली सरासरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पहिल्या दोन आठवड्यात तीन वेळा पोलादपूर शहराच्या सखल भागात व नदी किनारी वसलेल्या गावात पुराचे पाणी तीन वेळा रस्त्यावरून वाहू लागले होते तर ग्रामीण भागातील काही गावात दरड कोसळणे, गोठे, घरे आदीचे नुकसान झाले आहे.

जून महिन्यात उशिरा सुरू झालेल्या पावसाने फक्त ३०० मी मी ची नोंद झाली होती तर जुलै च्या पहिल्या १० दिवसात बाराशे मी मी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने पावसाची सरासरी वार्षिक सरासरीच्या ५५ टक्के झाली असली तरी गतवर्षी पेक्षा कमी पाऊस झाला आहे.

२०२५ मध्ये आजच्या दिवसापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी करत २ हजार मी मी ची सरासरी होती तर २०२६ मध्ये आजच्या दिवसापर्यत १८८७ मी मी नोंद झाली आहे. पाऊस दमदार पडल्याने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षी सुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवित हानी टळली आहे.

तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर, कीनेश्वर, दाभिल, तुर्भे खोडा, सवाद, बोरावले, गोवले, चांदके, पलचिल गोळेगणी, कोंढवी या ठिकाणी पडणार पाऊस व डोंगरे भाग व घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या ५५ टक्के पाऊस जुलै महिन्याच्या २० पर्यंत झाला आहे.

यावर्षी वेधशाळाने नोंदविले निर्देश लक्षात घेता, या वर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा ५ ते १० टक्के पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे. तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडसह झाडे पडण्याच्या घटना कायम आहेत.

साखर येथील ढवली नदीवरील पुलाचे रिटर्न तुटल्यामुळे दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजनास्तव सदर पुल तात्पुरत्या स्वस्थात वाहतुकी साठी बंद करण्यात येत आहे. सदर कारणामुळे पोलादपूर तालुक्यातील बोरघर, साखर, गोवेले, अडावले, मोरसडे या गावांचा संपर्क तुटला असून आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर नागरिकांसाठी पूल तातडीने सुरु करण्यात येणार आहे.

तहसीलदार कपिल घोरपडे सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने परिस्थितीवर मात करत भूत्खलन झालेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली आहे.

यामध्ये नाणेघोळ ३२ कुटुंबातील ६७ नागरिकांना, क्षेत्रफळ धनगरवाडी येथील ५ कुटुंबातील २६ नागरिक, माटवन मोहल्ला येथील ७ कुटुंबातील ४० जणांना, सवाद येथील ७० कुटुंबातील २०० नागरिकांना तसेच कणगुले येथील १० कुटुंबातील ३५ नागरिक असे १२४ कुटुंबातील एकूण ३६८ जणांना स्थलांतरित करण्यात आले होते. 

क्षेत्रफळ येथील गावाजवळच भूत्खलन झाले असून, नानेघोळ येथील डोंगराला भेगा पडल्याने येथील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे. सडे येथे गावच्या वरील बाजूस भेगा गेल्या आहेत सदर भागाची पाहणी करण्यात आली व तेथील13 कुटुंबातील 37 व्यक्तींना हनुमान मंदिर सडे येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील 4 बैल गाय मृत्युमुखी झाली तर 2 बकरी चा मृत्यू झाला आहे तर पूर शिरल्याने 151 घराचे नुकसान झाले आहे तर12 पक्की घराचे किरकोळ तर 2 कच्ची घराचे नुकसान झाले आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान

पोलादपूर तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे अंतिम टप्यात असल्याची माहिती आपत्ती निवारण मार्फत देण्यात आली जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात व दुसऱ्या आठवड्यात मौजे नानेघोळ येथील ३३ कटुबातील ६९ नानगरीकाना मौजे केवनाळे सोलारवाडी येथील मदिरामध्ये विस्तापीत करण्यात आले होते.

साखर गावाजवळ तसेच पोलादपूर महाबळेश्वर कापडे रस्त्यावर आलेली दरड, क्षेत्रपाळ (धनगरवाडी) गावालगत दरड जेसीबीच्या बाजूला करण्यात आले होते. ओंबली, कामथे (माडाचीवाडी), कुंभळवणे फाटाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती या सुद्धा ठिकाणी यंत्रणा लावत दरड माती झाड बाजूला करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT