पोलादपूर: दक्षिण रायगड व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा व ब्रिटिश कालीन वाहतुकीसाठी प्रमुख रस्ता असणारा पोलादपूर महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गवरील पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गवरील वाहतूक नैर्सगिक आपत्ती निहाय ३१ जुलैपर्यत सर्व वाहतुकी साठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.
पुणेला जाण्यासाठी पाली -खोपोलीमार्गे तर कोल्हापूर सातारा साठी कुंभार्ली घाट पाटणमार्गे द्राविडी प्रवास करावा लागत आहे.
हा प्रवास द्राविडी व खर्ची होत असल्याने प्रवासी वर्गाचा वेळ वाया जात असला तरी प्रवासी वर्गाच्या खबरदारीसाठी आंबेनली घाटाचे रुंदीकरणाचे कामासह या मार्गावर पावसाळी हंगामात दरड व मातीचे ओसरत कोसळत असल्याने ३१ जुलैपर्यत बंद ठेवण्यात आला आहे, तर वरंधघाटाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सलग 3 वर्षे या मार्गाने काम सुरू असल्याने हा मार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न येथील प्रवासी वर्गाला पडला आहे.
पोलादपूर महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गाचे काम चालू आहे त्यातच मुसळधार पावसात दरड कोसली होती काही प्रमाणात ती बाजूला करण्यात आली असली तरी मागणी पावसाळ्यात व रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट काळात सदरच्या मार्गवरील उपाययोजनांसाठी सदरचा रस्ता जिल्हाधिकारी रायगड जिल्ह्याला पोलादपूर तहसील कार्यलयामार्फत पत्र देण्यात आल्यानंतर या मार्गवरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे महाबळेश्वर नजीक मेटतले येथे सुद्धा रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने महाडनाका येथे रस्ता बंद करण्यात आला आहे, मात्र काही लहान चारचाकी वाहतूक सुरू असल्याने बंद बाबत शंका निर्माण होत आहे.
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचे सुधारणेचे काम कंत्राटदार आर पी पी एस आय पी एल याचेमार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. सदर रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासुन महाबळेश्वरकडे जाताना १ कि. मी अंतरावर दरडप्रवण क्षेत्र आहे.
सदर ठिकाणी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगड गोठे व माती रस्त्यावर आली होती सदर रस्त्यावर आलेली माती व दगड गोठे जेसीबीच्या सहायाने काढण्याचे काम कंत्राटदार) याचेमार्फत बाजूला करण्यात आली तसेच वरुन अजुन माती व दगड येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरून अक्कलकोट, तुळजापूर कोल्हापूर मिरज सह महाबळेश्वर महाड मुंबई, वाई महाड मुंबई, पाचगणी महाड मुंबई, सह नालासोपारासह वसई पालघर आगराच्या बसेस महाबळेश्वर तालुक्यातील गावात येत असतात त्याबसेससह पोलादपूर पारगाव खंडाळा स्वारगेट बस पुढील काही काळासाठी बंद ठेवत इतर मार्ग द्वारे सोडण्यात आल्या आहे, अशी माहिती महाड पोलादपूर वाई महाबळेश्वर बस स्थानकामधून भ्रमणध्वनी द्वारे दिली आहे.
वरंध, ताम्हणी महाबळेश्वर मार्ग बंद ठेवण्यात आल्याने या मार्गवरील बहुतांशी बसेस कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक कुंभाली पाटण मार्गे वळविण्यात आली आहे मात्र या ही रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवासी वर्गाला वेळ लागत असून जादा रुपये मोजावे लागत आहे.
एसटी वाहतूक बंद
आंबेनळीसह वरंध घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने व एसटी बसेस इतर मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवासी वर्गाला लांबच प्रवास करावा लागणार आहे. पुण्याला जवळचा मार्ग म्हणून वरंध घाट ओळखला जातो मात्र त्या मार्गवरील एसटी वाहतूक बंद असल्याने पुण्याला जाणारी वाहतूक ताम्हणी मार्गे जात असते मात्र या पावसाळ्यात ती रस्ता पूर्ण पणे खचल्याने नव्याने बनविण्यासाठी काही दिवस जाणार आहे, हा मार्ग सुद्धा सर्वच वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.