Poladpur Bus Stand Pudhari
रायगड

Poladpur Bus Stand: पोलादपूर बसस्थानक आता २४ तास सेवेत; रात्री लांब पल्ल्याच्या एसटीला थांबा

भरतशेठ गोगावले यांनी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पोलादपूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणी व नूतनीकरणाच्या कामाची पाहणी कॅबिनेट मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली.

बसस्थानक परिसराच्या पुढील विकासाबाबतही सूचना दिल्या. रात्री येथील स्थानक बंद असल्याने अनेक कोकणात, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस मार्गस्त होत असल्याने पोलादपूर बसस्थानकमध्ये शुकशुकाट असतो, मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या स्थानकात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असल्याने रात्रीच्या बसेसची नोंद होणार त्याचप्रमाणे प्रवासी वर्गाला प्रवास करणे शक्य होणार आहे.

अनेक वर्षांपासून बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने प्रवाशांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत होता. प्रवासी व तालुक्यातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत ना. भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना या कामाला प्राधान्य दिले.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून २.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला. मंजूर आराखड्यानुसार एस. ई. चव्हाण कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत बसस्थानकाचे मजबूत, आधुनिक व दर्जेदार बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. नव्या स्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

यासोबतच प्रवाशांसाठी ना. भरत गोगावले यांनी मागणीनुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पोलादपूर बसस्थानक आता २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच कोकण व पश्चिम महाराष्ट्राकडे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसांना रात्रीच्या वेळीदेखील पोलादपूर येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे.

पोलादपूरमधील एखाद्या प्रवासाला एसटी बस अभावी इतर वाहनाचा आधार घ्यावा लागत होता मात्र २४ तास नियंत्रण कक्ष चालू होणार असल्याने स्थानकात वर्दळ वाढणार आहे. यासुविधेमुळे प्रवासीवर्गाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तसेच कॅबिनेट मंत्री ना. भरत गोगावले आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT