श्रीवर्धन : आनंद जोशी
महाराष्ट्रातील काही गावे जशी थोर विभुतींच्या, देशभक्तांच्या पवित्र पदस्पर्शाने, धार्मिक वा ऐतिहासिक महात्म्यामुळे पावन झालेली आहे. तेच भाग्य रायगड जिल्हयातील श्रीवर्धन तालुक्याला लाभले आहे. ‘श्रीवर्धन’ नावाचा अर्थ ‘समृध्दी वाढविणारा’ किंवा ‘भगवान विणू’ असा आहे. या नावामध्ये ‘श्री’ म्हणजे (समृध्दी) व ‘वर्धन’ म्हणजे वाढविणारा असा आहे. ज्या पेशव्यांनी इतिहासात कठीण काळातही महाराट्राचा कारभार समर्थपणे सांभाळला आणि आपल्या बुध्दीमत्तेने, कर्तृत्वाने मराठी साम्राज्याचे तत्कालिन पेशवेपद समर्थपण सांभाळले त्या श्रीमंत पेशव्यांची श्रीवर्धन ही जन्मभुमी.
मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मठिकाण. बाळाजी विश्वनाथ यांचे आडणाव ‘भट.’ जे जंजिऱ्याच्या नबाबांच्या (सिध्दींच्या) नोकरीत होते. सिध्दींच्या अंमलात या घराण्याकडे श्रीवर्धनची ‘देशमुखी’ होती. कोणत्यातरी कारणाने सिध्दींची भट घराण्यावर मर्जी खप्पा झाल्याने बाळाजी हे कुटूंबासह निघ्ुान श्रीवर्धननजिक असलेल्या रत्नागिरी जिल्हयातील वेळास या गावी त्यांचे स्नेही व नाना फडणीसांचे पुर्वज श्री. भानू यांचेकडे गेले. त्यांच्यासह तेथून साताऱ्यास गेले. तेथे मराठयांचे मातब्बर सरदार धनाजी जाधव यांचे पदरी नोकरीस राहीले असा उल्लेख ‘पेशव्यांची बखर’ मध्ये आढळतो.
पुढे बाळाजींची कर्तबगारी पाहून छ. ााहू महाराजांनी त्यांना पेशवाईची वस्त्रे दिली व ते पहिले पेशवे झाले. सन 1696 मध्ये बाळाजींचा उल्लेख ‘देशमुख दंडा राजपुरी व अधिकारी श्रीवर्धन’ असा आढळतो. (संदर्भ -मराठी रियासत, भाग 4 - सरदेसाई) 3 एप्रिल 1720 रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यु झाला. त्यानंतर 1750 मध्ये बाळाजी बाळीराव यांनी पेशव्यांचा वाडा परत बांधला. त्यानंतर 1906 पर्यंत त्याच्या भिंती उभ्या होत्या असे संदर्भ आढळले आहेत. श्री हरिहरेश्वर हे श्रीमंत पेशव्यांचे कुलदैवत असून या ठिकाणी रमाबार्ई साहेबांपासून अनेक मान्यवर येऊन गेले आहेत.
स्थापत्यकलेचे नमुने
श्रीवर्धनमध्ये कोकणी संस्कृतीचे प्रतिबिंंब दिसते. इथल्या लोकांची जीवनशैली, त्यांच्या परंपरा, उत्सव हे सर्व इथल्या संस्कृतीचे प्रतिक आहेत. पेशवेकालीन असलेल्या या ाहरांत श्रीलक्ष्मीनारायण, श्रीसोमजाई, श्रीजीवनेश्वर, श्रीभैरवनाथ, जवळच असलेले श्रीकुसुमादेवी मंदिर अशी मंदिरे असून ती तात्कालिन स्थापत्य कलेची साक्ष देतात.