Pen house burglary (छायाचित्र- कमलेश ठाकूर)
रायगड

Pen house burglary : पेणमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या; सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पेण : पेण शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन घरांची कुलपे फोडून तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. कुंभार आळी तसेच संत आळी नवीन वसाहत परिसरात झालेल्या या घरफोड्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

१ सप्टेंबर रोजी रात्री १.३० ते सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांच्या मुख्य दरवाज्यांचे लॉक हत्याराच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटांचेही कुलूप फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

या प्रकरणी सुबोध दत्तात्रय पाटील आणि राजेश रमेश म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १० ग्रॅम सोन्याची चेन, ५ ग्रॅम सोन्याची चेन, ५ ग्रॅम सोन्याचे कानातले, २ ग्रॅम सोन्याची अंगठी , २ ग्रॅम सोन्याचे पान आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजते.

या घटनेप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण पुढील तपास करीत आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा बंदोबस्त आवश्यक आहे.

  • पेण शहरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तसेच महिन्यापूर्वीच पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी आलेले निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT