पेण : कमलेश ठाकूर
पेण तालुक्यात जिल्हा परिषदसाठी भाजप पाच पैकी चार जागावर विजयी तर शिवसेना उबाठा एका जागेवर विजयी झाला. पंचायत समितीवर भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवले असून 10 पैकी आठ जागा मिळविल्या आहेत. पेण मधील दादर जिल्हा परिषद गणातून वैकुंठ पाटील यांनी तब्बल आठ हजार मताच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवारचा पराभव करून विजय मिळविला आहे.
आमदारची सून आणि खासदार यांची पत्नी पराभूत
पेण तालुक्यात भाजपने सत्ता मिळविली असली तरी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांची सुनबाई शर्मिला वैकुंठ पाटील यांना शिहू गटातून उबाठा गटाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी पराभूत केले तर खासदार धर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांना जांभूळपाडा गटातून शिवसेनेच्या शर्मिला बुंदके यांनी पराभूत केले. त्यामुळे एकाच वेळी आनंदसुद्धा आणि दुःख सुद्धा असे पेण आमदार आणि खासदर यांच्या वाटयाला या निवडणुकीत आले.
शिहु गटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी; शिहू गटात मशाल पेटली
पेण तालुक्यातील रायगडजिल्हा परिषदेच्या शिहुगटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर या विजयी झाल्या तर पेण पंचायत समितीच्या डोलवी गणातुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रिती प्रशांत पाटील या विजयी झाल्या तर शिहु पंचायत समीती गणातुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय भोईर हे विजयी झाले. ही निवडणुक शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतुत्वाखाली लढविण्यात आली.
ही निवडणुक आम्ही सकारत्मक व जबाबदारीने घेतली ही निवडणुक भाजपच्या नेत्यानी प्रतिष्ठेची केली होती परंतु जनतेचा आमच्या कामावर विश्वास होता म्हणुन जनतेने आमच्यावर विश्वास दाखवुन विजयी केले आसल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले.