पेण ः पेण नगरपरिषदेच्या 12 प्रभागात सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत 10.34 टक्के मतदान झाले. तर 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 24.67 टक्के मतदान नोंदवण्यात आले. त्यानंतर आकडेवारी वाढून दुपारी दीड वाजेपर्यंत 40.53 टक्के मतदान झाले.
यानंतर दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 55.96 टक्के मतदान झाले. यानंतर मतदानची आकडेवारी अजून वाढत जाऊन सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ते शेवटचे मतदान होईपर्यंत 70.30 टक्के मतदान झाले. यात एकूण मतदार 33875 पैकी महिला मतदार 11606 व पुरुष मतदार 12208 यांनी मतदान केले. या 12 प्रभागामध्ये 41मतदान केंद्र होती यात 46 उमेदवार उभे होते.
पेण नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचेकडून माजी नगरध्यक्ष प्रीतम ललित पाटील या उमेदवार असा एकत्र गट होता. तर काँग्रेसच्या नंदा म्हात्रे व या दोघांच्याही विरोधात आम्ही पेण कर विकास आघाडी तर्फे रिया धारकर या रिंगणात उभ्या होत्या.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये तणाव तनावात
प्रभाग क्रमांक 4 मध्ये सोमवार च्या रात्री शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अरुणा सुहास पाटील व विरोधी पेण विरोधी उमेदवार हर्षा पाटील यांचे वडील व स्वतः उमेदवार असणारे अनिरुद्ध पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. याठिकाणी पोलिसांनी तात्काळ भेट देऊन वाद थांबवीला. मात्र आज मतदानाच्या दिवशी या प्रभागात वाढीव पोलीस बंदोबस्त ठेऊन मतदान सुरळीत पार पाडण्यात आले.
18 नगरसेवकांसाठी निवडणूक
12 प्रभागासाठी 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे होते. तर 24 नगरसेवक असताना 6 नगरसेवक अगोदरच बिनविरोध विजयी झाले असल्याने 18 नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली. ही निवडणूक मतदानाच्या दिवशी मात्र शांततेत झाली.आता मात्र या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मात्र फार दिवस वाट पहावी लागणार आहे.