पेण प्रतिनिधी (कमलेश ठाकूर)
पेण नगरपालिकेवर भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) युतीतर्फे प्रीतम ललित पाटील या १४,२७३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’ गटाच्या रिया धारकर यांचा ८,४१२ मते मिळवून पराभव केला. तर काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना केवळ ६८७ मते मिळाली.
यावेळी मात्र सर्व पक्षांनी आपापली खाती उघडली. एकूण २४ जागांपैकी भाजपच्या १२ जागा, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या ५ जागा अशा एकूण १७ जागांवर युतीला बहुमत मिळाले. शिंदे गटातर्फे १ नगरसेवक, तर उद्धव ठाकरे गटातर्फे १ नगरसेवक विजयी झाला. याशिवाय धारकर गटातर्फे २ जागा, तर शृंगारपुरे गटातर्फे ३ जागा विजयी झाल्या.
पेण – नगरपरिषद निवडणूक निकाल २०२५
नगराध्यक्ष :
प्रीतम पाटील – विजयी (१४,२७३ मते)
प्रभाग क्रमांक :
१ अ) कलावती पाटील
ब) संतोष शृंगारपुरे
२ अ) पल्लवी कालेकर
ब) प्रवीण शंकर पाटील
३ अ) सुजाता डाकी
ब) संजय म्हात्रे
४ अ) अरुणा पाटील
ब) भूषण कडू
५ अ) अंजली जोगळेकर
६ अ) संगीता लाड
ब) आनंद जाधव
७ अ) आफ्रिन अखवारे
ब) कृष्णा भोईर सद्दाम
८ अ) जसवीन पाटील
ब) अनिरुद्ध पाटील
९ अ) निवृत्ती पाटील
१० अ) सुनीता जोशी
ब) निळकंठ म्हात्रे
बिनविरोध विजयी झालेले नगरसेवक :
१) अभीराज कडू
२) सुशीला ठाकूर
३) दीपक गुरव
४) वसुधा पाटील
५) मालती म्हात्रे
६) स्मिता माळी
यातील भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे ६ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले होते.
पेण नगराध्यक्ष – भाजप विजयी :
प्रीतम ललित पाटील – मते : १४,२७३
नगरसेवक विजयी – पक्षीय बलाबल :
भाजप – १२
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ५
शिंदेसेना गट – १ (भूषण कडू)
उद्धव ठाकरे गट – १ (अरुणा सुहास पाटील)
शृंगारपुरे गट – ३
धारकर गट – २