Pen heavy rain pudhari photo
रायगड

Pen heavy rain : पेणमध्ये मुसळधार पावसाने भातशेती गेली पाण्याखाली

शहरातील अनेक दुकानात, घरानाही घुसले पाणी

Asit Banage

पेण : पेण तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून त्याचा फटका पेण तालुक्यातील भातशेतीला आणि तालुक्यातील अनेक गावातील घरात आणि शहरतील दुकानात देखील बसला असल्याचे दिसून येत आहे. पेण तालुक्यात शनिवारी संध्यकाळ पर्यंत 105 मिमी पडलेल्या पावसाची नोंद झाली. अनेक नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत होत्या.

पेण शहरातील अनेक दुकानातही, आणि सखल भाग असणाऱ्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. पेण तालुक्यातील खाडीलगतची भातशेती मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली असून आणखी दोन तीन दिवस सलग मुसळधार पाऊस पडत राहिल्यास जमिनीच्या वर आलेले भाताची रोपे कुजण्याची स्थिती तयार झाली आहे.

पेण शहरातील म्हाडा कॉलनी तील काही भाग, उत्कर्ष नगर,बाजारपेठ, शंकर नगर, रामवाडी च्या खालील भागात, पावसाचे पाणी शिरले होते. पेण स्थनकाच्या समोरील भागातही दुकानात पाणी शिरले होते. शिरलेले पाणी दुपारपर्यंत वाढतच होते काहींच्या दुकानात एक फुटपर्यंत पाणी चढले होते.

नदीकिनारीही घरांमध्ये पाणी

अशीच स्थिती बळवली, खरोशी, जिते, आंतोरे, आदी नदीकिनारी गावातील घरातही पाणी शिरले होते. पेण शहराला लागून असणारी भोगावती नदीही पुरस्थितीत शनिवारी दिवसभर वाहत होती. भोगावती नदी किनारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगली तर तहसील कार्यलयातील अधिकार्यानी पुरस्थितीचाही आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT