अभिषेक ढालवाणी  Pudhari
रायगड

Panvel River Drowning | नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

कोंडीची वाडी येथील नदीपात्रातील घटना, सुकापूर परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Boy Drowns In Panvel River

पनवेल : कोंडीची वाडी येथील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली. या घटनेमुळे सुकापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अभिषेक एलिया ढालवाणी (वय १६, रा. अय्यप्पा मंदिरामागे, सुकापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा आपल्या चार मित्रांसह वाजेगावजवळील बाबदेववाडी-कोंडीची वाडी ओव्हरब्रिजखालील नदीपात्र परिसरात फिरण्यासाठी गेला होता. तेथे सर्व मित्रांनी नदीत पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिषेकला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

अभिषेकला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी आटोकाट प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून अभिषेकला नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नद्या, तलाव आणि धरण परिसरात पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज येणे कठीण असते. त्यामुळे पोहता येत नसल्यास अशा ठिकाणी पाण्यात उतरू नये आणि नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT