Rajyastariya Atal Karandak Panvel
पनवेल: रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या 'राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पनवेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यातील या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या १२ व्या पर्वाचा मानाचा 'अटल करंडक' पुणे येथील 'रंग पंढरी' संस्थेच्या 'बरड' एकांकिकेने पटकावला. या विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि करंडक प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांना 'गौरव रंगभूमीचा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप: सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी ५० हजार रुपये रोख.
नीना कुलकर्णी (ज्येष्ठ अभिनेत्री) आणि सुनील बर्वे (लोकप्रिय अभिनेते) यांनी नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीज अशा सर्व माध्यमांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. स्पर्धेचा नयनरम्य सोहळा पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चालला. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत भव्य आणि नयनरम्य होता.
प्रवेशद्वारावर भव्य नटराज प्रतिकृती आणि लाल कार्पेटची व्यवस्था करण्यात आली होती. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रामशेठ ठाकूर होते. आमदार प्रशांत ठाकूर (अध्यक्ष, नाट्य परिषद पनवेल शाखा) आणि स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आणि अभिनेते सुनील तावडे यांनी काम पाहिले.
सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसिडर सुव्रत जोशी यांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले.
विजेत्या एकांकिका आणि वैयक्तिक पारितोषिकेराज्यभरातील विविध केंद्रांवर प्राथमिक फेरीत १०२ एकांकिकांनी सहभाग घेतला होता, त्यातून निवडलेल्या २५ एकांकिका अंतिम फेरीत होत्या. क्रमांक एकांकिकेचे नावसंस्था/ महाविद्यालय पारितोषिक (रुपये) प्रथम बरड रंग पंढरी, पुणे १,००,०००/- द्वितीय सपान डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल, मुंबई ७५,०००/- तृतीय स्वातंत्र्य सौभाग्यमुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड ५०,०००/- लक्षवेधी हॅशटॅग इनोसंट अलडेल एज्युकेशन ट्रस्ट, पालघर ३०,०००/- परीक्षक पसंती किचक वध पुन्हा सीकेटी स्वायत्तम महाविद्यालय, पनवेल २०,०००/- प्रमुख वैयक्तिक मानकरी पुरस्कार विजेते एकांकिका संस्था सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निलेश गोपनारायण हॅशटॅग इनोसंट पालघर सर्वोत्कृष्ट अभिनेता रघुनाथ बर्वे हॅशटॅग इनोसंट पालघर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ताईडी बरड पुणे सर्वोत्कृष्ट लेखक सुनील पोपट डोंगरे बरड पुणे सर्वोत्कृष्ट संगीत रोहित महादेव बरड पुणे
नीना कुलकर्णी: "नाट्यकला ही सामूहिक कला आहे. अशा करंडकातून नव्या पिढीला चांगले व्यासपीठ मिळाले आहे, ज्यामुळे मराठी नाटकाचे भविष्य उज्वल आहे.
"सुनील बर्वे: "तरुण पिढीची शक्ती रंगभूमीसाठी काम करत आहे, त्यामुळे रंगभूमी कायम ऊर्जांवस्थेत राहील.
"गिरीश ओक (परीक्षक): "महाअंतिम फेरीत तब्बल २५ एकांकिकांचे परीक्षण करताना विषयांचे वैविध्य होते. हेवा वाटेल असे कलाकार यामध्ये बघायला मिळाले. अटल करंडक' स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे ब्रीद घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे १२ वे पर्व पूर्ण केले आहे.