Panvel rain damage, pudhari photo
रायगड

Panvel rain damage : पनवेलमध्ये जोरदार पावसामुळे झाडे कोसळली

काही काळ वाहतूककोंडी; तालुक्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी : सध्या परतीचा पाऊस सुरू झाला आहे. सायंकाळच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका झाडांना बसत आहे. झाडे कोसळल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील आकुर्ली, चिपळे जवळील झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने रस्त्यालगत पडलेली झाडे हटवून बाजूला करण्यात आली मात्र तोपर्यंत परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

या वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना बसला. त्यातच विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने सायंकाळ पासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणचा विद्युत पुरवठा एक- दोन तासानंतर सुरळीत करण्यात आला. मात्र काही गावांचा विद्युत पुरवठा सुरू व्हायला वेळ लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT