पनवेल न्यायालयाची जागेची अडचण दूर pudhari photo
रायगड

Raigad News : पनवेल न्यायालयाची जागेची अडचण दूर

दोन मजली वाढीव बांधकामाला लवकरच सुरुवात, वर्षभरात सेवेत

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील जागेची अडचण आता दूर होणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या बांधकामासाठी 10 कोटी 16 लाख 57 हजार 894 रुपये खर्च केले जाणार आहेत. याचा वकील, पक्षकार, नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

दोन मजले बांधण्याकरिता निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या संदर्भात त्यांनी व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ आणि सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा जाहीर होऊन हे काम उल्हासनगर येथील रचना कंट्रक्शन या कंपनीला मिळाले आहे. आता या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणार असून एक वर्ष कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

पनवेल येथील नवीन इमारतीमध्ये सह दिवाणी न्यायालय व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल हे सहा कोर्ट तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे चार कोर्ट, जिल्हा व अति सत्र न्यायालय चार कोर्ट, तसेच पोस्को न्यायालय एक असे एकूण 15 न्यायालये आहेत. परंतु नवीन न्यायालयात तळमजला अधिक एक मजला असे एकूण प्रत्यक्षात आठ कोर्ट हॉल असून त्यामध्ये सद्य:स्थितीत दाटीवाटीने 15 कोर्ट कार्यान्वित आहेत.

सात न्यायालयांना रितसर कोर्ट हॉल उपलब्ध नाही. आणि त्याकरीता नवीन इमारतीमध्ये असलेली वकीलांची लायब्ररी तसेच कॅटींगमध्ये सिव्हिल प्रीझोनमध्ये कोर्ट बसवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. पनवेल न्यायालयाकरिता मंजूर न्यायाधीश, वकील व न्यायालयात येणारे पक्षकार यांच्या तुलनेने सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या सर्वाना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पनवेल न्यायालयाच्या वाढत्या कामकाजाला न्याय देण्यासाठी अतिरिक्त मजल्यांची अत्यंत गरज होती. या कामाला येत्या महिन्यात सुरुवात होणार आहे. दोन नवीन मजल्यांमुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होणार असून वकील, न्यायाधीश आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ॲड. मनोज भुजबळ, अध्यक्ष, पनवेल वकील संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT