

मुंबई : मुस्लिम समुदायावरील असलेला बहुपत्नीत्व विरुद्धचा भारतीय न्याय संहिता कलम 82 लागू करावे अशी मागणी भारतीय मुस्लिम महिला संघटनेने मंगळवारी मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी सहसंस्थापिका जकिया सोमन, नूरजहान सफिया नियाज,जकिया सोमन नूरजहान सफिया नियाज जावेद आनंद ,फिरोज मिठीबोरवाला, शमशुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी ब्रेकिंग द सायलेन्स या मुस्लिम महिलांसाठी उपयोगी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जकिया सोमन म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतरही मुस्लिम महिलांना विवाह व कुटुंब व्यवस्थेत न्याय व समानता मिळालेली नाही.
यापूर्वीच मुस्लिम कौटुंबिक कायद्यात सुधारणा होणे आवश्यक होते.अन्य समुदायातील महिलांप्रमाणे कायदेशीर संरक्षण मिळणे हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. यासाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन 2007 पासून लढत आहे. त्यामुळेच 2019 ला तिहेरी तलाकविरुद्धचा कायदा येऊ शकला. आता मुस्लिम समुदायावर भारतीय न्याय संहिता कलम 82 लागू करणे आवश्यक आहे. हे बहुपत्नीविरुद्ध आहे. मुस्लिम समुदायातील बहुपत्नीत्व संपवावे तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 देखील मुस्लिम समाजास लागू केला पाहिजे.
फिरोज मिठीबोरवाला म्हणाले,मुस्लिम महिलांना सतत अन्याय सहन करावा लागतो.महिलांच्या या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. यावेळी डॉ.झीनत अली व जावेद आनंद यांनी मुस्लिम महिलांसाठी करण्यात आलेल्या या मागण्याना पाठिंबा असल्याचे सांगितले. मुस्लिम समुदायात एका व्यक्तीला दोन पत्नी असतील तर त्याचा त्रास दोघींनाही सहन करावा लागतो. पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार देण्यासाठी गेलो तर त्याची दखल घेतली जात नाही,अशा भावना उपस्थित महिलांनी यावेळी मांडल्या.