Palasdari Accident 
रायगड

Palasdari Accident | पळसदरीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात तरुणी ठार

चालक तरुण गंभीर जखमी; अरुंद मार्गामुळे आणखी एक बळी; नागरिकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : रायगडच्यश कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास इसलेल्या भीषण अपघातात दुचाकी-वरील एका तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर अर्धवट राहिलेल्या रस्त्यामुळे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे नागरिकां-मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताकई येथील मित्रांचा एक गट साजगाव येथील चालकासह माथेरानकडे जात होता. पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे पोशिर येथील तरुणाच्या दुचाकीची वैगनार कारशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील त्याची अंबरनाथ वैधील मैत्रीण ही गंभीर जखमी होऊन आगीच मृत्युमुखी पडली. जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी श्री स्वामी समर्थ मठाची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाल्याने स्थानिकांच्या मदतीने अखमींना उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे हलविण्यात आले.

दरम्यान, कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्थवट असून काही भागात रुंदी अचानक कमी होते. तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेट्स व रसते चिन्हांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षात मोबदला मिळाला नसल्याने रस्ता अर्थवट आहे.

सध्या भूसंप्यदन विभागात हालचाली सुरू असल्या तरी राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या कमिशनच्या घोलापाई मोबदला रखडला आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून पळसदरी रस्ता आणखी किती बळी घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या भीषण अपघात प्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट असून काही मागात रुंदी अचानक कमी होते. तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स व सस्ते चिन्हांचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT