Matheran Transport- गिरीस्थान माथेरानची वाहतूक व्यवस्था कोलमडली

Matheran Transport- पर्यटकांमध्ये नाराजी; वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल झाल्यास बारा महिने पर्यटन वाढणार
Matheran Transport
Matheran Transport
Published on
Updated on

माथेरान : मिलिंद कदम

माथेरान मध्ये पावसाळी पर्यटन हंगाम तेजीत सुरू झाला आहे, या काळात माथेरानमध्ये तेलंगणा केरळ व गुजरात येथील सर्वाधिक पर्यटक येत असतात वीकेंडला माथेरान तर फुल असते परंतु मधल्या दिवसाची आता भरपूर प्रमाणात पर्यटन घेऊ लागले आहेत. परंतु अनेक पर्यटकांना येथील वाहतूक व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केले असून अनेकांना ई-रिक्षा टॅक्सी सर्विस मिनीट्रेन प्रवास याकरीता रांगेमध्ये खूप वेळ उभे राहावे लागत आहे. त्यामुळे यामध्ये बदल व्हावा अशी अपेक्षा पर्यटक करत आहेत.

माथेरानला मधल्या दिवसांमध्ये तीन ते साडेतीन हजार पर्यटक येत असतात तर वीकेंडला हाच आकडा दहापट वाढत असतो त्यामुळे या येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक व्यवस्थेचा फटका दर वीकेंडला बसत आहे. नेरळ माथेरान हा एकमेव घाट रस्ता असल्याने या ठिकाणी टॅक्सीने वरती येण्याकरिता प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येत असते व रविवारी येथील प्रवेशद्वा रावर तीच गर्दी पुन्हा दिसत असेल जमुळे येणारा पर्यटक पुन्हा माथेरान नको अशी भावना मनाशी बाळगून जात असतो वरती येताना तरुण पर्यटक हे घोडे सवारीचा आनंद घेत असतात तर काही लोक इ रिक्षा साठी तासनतास रांगेमध्ये उभे असलेले पहावयास मिळतात.

आपल्या आलिशान गाडीमध्ये मुंबई पुणे सारख्या शहरात दोन तासात माथेरानमध्ये पोहोचलेला पर्यटक ई-रिक्षाच्या रांगेमध्ये तास-दीड तास घालवतो ही इथली शोकांतिका आहे मिनी ट्रेन बाबतही हीच परिस्थिती आहे मर्यादित सेवा असल्यामुळे प्रत्येक ट्रेनमध्ये फक्त १२० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे व येणाऱ्या पर्यटकांचा लौंडा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे रांगा पहावयास मिळतात व ज्यांना तिकीट मिळत नाही ते आपली नाराजी व्यक्त करतात.

माथेरानच्या पर्यटन वाढीकरिता येथल वाहतूक व्यवस्थेमध्ये लक्ष देणे गरजेचे आहे कारण वाहतूक व्यवस्था हा प्रत्येक पर्यटनस्थळाचा कणा असतो, पारंपारिक पर्यटनातून बाहेर पडून आता माथेरानमध्ये वाहतूक क्रांती येणे ही काळाची गरज आहे, कारण इतर आधुनिक पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेराने खूप मागे पडले असेल वाहतूक व्यवस्थेत बदल झाल्यास इथेही बारा महिने पर्यटक येतील.

आम्ही गुजरात वरून आलो सकाळी १० वाजता रिक्षासाठी रांगेमध्ये उभे होते व आम्हाला रिक्षासाठी सव्वा तास वाट पहावी लागली, आमच्या बरोबर वयस्क व्यक्ती असल्याने त्यांना घोडा किंवा हात रिक्षा प्रवासाचा त्रास झाला असता, आम्ही अनेक वर्षांपासून माथेरानला येतो पण आता येथील वाहतूक व्यवस्था सुधारली तरच पुन्हा येऊ.

- श्री. पराग मेहता, पर्यटक सुरत

माथेरान वरून सुटणाऱ्या ११.३५ च्या मिनीट्रेनसाठी आम्ही दहा वाजल्यापासून रांगेत उभे होतो, परंतु काही वेळातच ही गाडी फुल झाली त्यामुळे आम्हाला त्यानंतर २ वाजताची ट्रेनची तिकीट मिळाली, मुलांसाठी आम्हाला पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी चार तास रांगेत उभे रहावे लागले, यामध्ये बदल व्हायला हवा इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मिनीट्रेनसाठी थांबत असतात, त्यामुळे या फेऱ्यांमध्ये वाढ व्हायला हवी.

- श्री. किशोर शिंदे, पर्यटक पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news