Book Pudhari
रायगड

Free Textbook Distribution: समग्र अभियानांतर्गत २ लाख २५६ विद्यार्थांना पुरविणार मोफत पाठ्यपुस्तके

यावर्षी म्हणजेच सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षात 2 लाख 256 विद्यार्थ्यांना 10 लाख 89 हजार 195 पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तके यांचे वाटप होणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येतात. यावर्षी म्हणजेच सन 2026-2027 या शैक्षणिक वर्षात 2 लाख 256 विद्यार्थ्यांना 10 लाख 89 हजार 195 पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते.

यानुसार जिल्ह्यातील ३ हजार ३८ शाळांमधील २ लाख २५६ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे.

मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT