रायगड

Panvel MIDC : पनवेल तालुक्यात होणार नवीन एमआयडीसी : उद्योगाला मिळणार चालना

अविनाश सुतार

खारघर; सचिन जाधव: रायगड जिल्ह्यातील पनवेल (Panvel MIDC)  आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या हद्दीवर २१५ एकरांवर नवी एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. राज्य प्रदूषण मंडळाच्या संमती समितीने येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच या भागात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होऊन नवी औद्योगिक वसाहत कार्यन्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या औद्योगिक वसाहतीत १६७० कोटी ४६ लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

खासगीकरणातून ही एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी (Panvel MIDC)  करण्यात येत आहे. मायक्रोटेक डेव्हल्पर्स लिमिटेड च्या वतीने उभारणी करण्यात येत आहे. अंबरनाथ उसाटणे आणि पनवेल तालुक्यातील नीतळस गावांच्या हद्दीत होणार आहे. एकाच छताखाली या एमआयडीसीत विविध उद्योग उभे राहणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रथम ऑगस्ट २०२२ मध्ये मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने राज्य प्रदूषण मंडळाच्या समितीसमोर सादर केला होता. त्यावेळी संमती समितीने काही शंका उपस्थित करून विकासकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरविले होते.

यात पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, पर्यावरणीय गुंतवणुकीत तफावत असणे, पर्यावरण मंजुरी नसणे, अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर १२ डिसेंबर २०२२ रोजी आपले म्हणणे सादर केले. यात ही एकात्मिक औद्योगिक वसाहत असून तिथे ते पायाभूत सुविधा पुरविणार आहेत. त्यासाठी ९३ कोटी ५१ लाख रुपये पहिल्या टप्प्यात खर्च करणार आहेत. येथे एकूण गुंतवणूक १६७० कोटी ४६ लाख रुपयांची असली तरी एकात्मिक औद्योगिक वसाहत असल्याने येणारे उद्योजक आपापली पर्यावरण परवानगी स्वतंत्र घेणार आहेत. त्यामुळे विकासकास परत स्वतंत्र पर्यावरण परवानगी घेण्याची गरज नाही. या स्पष्टीकरणास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समाधान झाल्याने त्यांनी १८ जानेवारी २०२३ रोजीच्या आपल्या संमती समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

९३.५१ कोटींच्या पायाभूत सुविधाप्रस्तावित वसाहत ८,६२,९०१ चौरस मीटर क्षेत्रावर उभी राहणार आहे. येथे ९,८५,३३६ चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे. सी लिंक, विमानतळ, विरार – आलिबाग कॉरिडॉर या प्रकल्पा बरोबर आता एमआयडीसी होणार असल्याने पनवेलचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT