नेरळ: नेरळमध्ये सहा वर्षीय चिमुकल्यावर 13 वर्षीय मुलाकडून गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पोलीस सुत्राकडील कागदपत्र व माहितीनुसार सदर घटनेतील पीडित मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता. काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल दिसत असल्याने, आईने पिडित चिमुकल्याला विश्वासामध्ये घेत त्याच्या वागण्यात झालेल्या बदला संदर्भात विचारणा केली असता, पिडित मुलाने घाबरलेले अवस्थेत आपल्या सोबत घडत असलेला प्रकार हा त्याचे आई पुढे कथन केला.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगा चिमुकल्याला इमारतीच्या आड बाजूला असलेल्या डाग परिसरात नेऊन दमदाठी करत त्याच्या सोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप समोर आला आहे. हा प्रकार एकदाच नव्हे तर वारंवार घडत असल्याचे समोर आले.
या घटनेतील गांभीर्य लक्षात घेत, सदर घटनेची माहिती ही त्याचे कुटुंबीयांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीमधील गांभीर्य लक्षात घेत, नेरळ पोलीसांनी 13 वर्षीय मुलाच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तेरा वर्षे मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात त्याची रवानगी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.