Navi Mumbai Water Cut Pudhari
रायगड

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईतही उद्या संध्याकाळी पाणी नाही; गुरुवारी कमी दाबाने पुरवठा

गुरुवारीही दिवसभर कमी दाबाने पुरवठा होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

वाशी : सीबीडीतील पंप हाऊसमधील दुरुस्ती, कळंबोलीत जलवाहिनीवर व्हॉल बसवणे व घणसोलीतील जलवाहिनी जाडण्याची कामे महापालिकेने बुधवारी हाती घेतली आहेत. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईत पाणी येणार नाही. तर गुरुवारीही दिवसभर कमी दाबाने पुरवठा होणार आहे.

बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेने बुधवारी सी. बी. डी. सेक्टर-28 पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविण्यात येणार आहे. कंळबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-19 वंडरपार्क येथील जलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत. तसेच घणसोली सेक्टर 2 येथील 900 मी.मी. व्यासाची पाईपलाईन जोडण्यात येणार आहे.

त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 10 असे 12 तास ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT