खारघर: गेले कित्येक वर्ष चर्चित असणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते.त्यावेळी विमानतळ सुरू कधी होणार याबाबत कोणती ही घोषणा करण्यात आली न्हवती.अनेक नागरिकांना विमानसेवा सुरू होण्याची उत्सुकता होती. अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ख्रिसमस दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरपासून सामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईला गेल्या महिन्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) रूपात एक मोठी हवाई भेट मिळाली आहे. तथापि, येथून अद्याप कोणतीही विमान सेवा सुरू झालेली नाही. परंतु सामान्य प्रवासी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ते लवकरच पूर्ण होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून सामान्य प्रवाशांसाठी खुले होणार आहे.
ख्रिसमसच्या दिवशी सुरू होणारा हा नवीन प्रवास केवळ मुंबई महानगर प्रदेशाची हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत करणार नाही तर विमान कंपन्यांसाठी नवीन ऑपरेशन हबचा मार्गही मोकळा करेल. अनेक विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्यासाठी आपले प्रासंगिक करार करत असून टप्प्या टप्प्याने या नवीन विमानसेवा रुजू होतील . ख्रिसमसच्या दिवसापासून देशातील दोन प्रमुख विमान कंपन्या, इंडिगो आणि आकासा एअर नवी मुंबई येथून विमानसेवा सुरू करणार आहेत.
२५ डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अकासा एअरचे कामकाज सुरू होईल. पहिली विमानसेवा दिल्ली आणि नवी मुंबई दरम्यान सुरू होईल. त्यानंतर, येत्या काही दिवसांत ही एअरलाइन गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू करेल. नवी मुंबई विमानतळावरून दर आठवड्याला ३०० देशांतर्गत आणि ५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे एअरलाइनने सांगितले. २०२७ पर्यंत १० तळ स्थापन करण्याचीही त्यांची योजना आहे, ज्यामध्ये मध्य पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये आंतरराष्ट्रीय विस्ताराचा समावेश आहे.
नवी मुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळ सुरू होणार असून नवी मुंबईमधील रेसिडेन्सी हॉटेल रेस्टॉरंट पासून घरांच्या किमती मधे येत्या काळात कमालीचे भाव वाढणार असून आर्थिक उलाढाल ही वाढणार आहे. नवी मुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याचा दिनांक उजाडला तिकीट विक्री सुरू झाली असून तिकीट वर नवी मुंबई ते नॉर्थ गोवा असा उल्लेख आहे.त्यामुळे दि. बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाचा विषय अजून अनुत्तरित राहिला आहे.