दादर येथील MSRTC बसस्थानकावर परिवहनमंत्री तथा MSRTCचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. Pudhari
रायगड

Navi Mumbai Airport MSRTC Bus | नवी मुंबई विमानतळावरून दादर, सीएसएमटी, बोरिवली, पुण्याला थेट बससेवा

MSRTC कडून पहिल्या टप्प्यात २६ फेऱ्या; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai International Airport Direct Bus Service

विक्रम बाबर

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची (NMIA) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दादर, CSMT, बोरिवली आणि पुण्यासाठी थेट बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांतील प्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्यासाठी थेट आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

दादर येथील MSRTC बसस्थानकावर परिवहनमंत्री तथा MSRTCचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी NMIAL आणि MSRTCचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळावर दाखल झालेल्या बसचे NMIAच्या डिपार्चर फोरकोर्टवर स्वागत करण्यात आले.

दररोज २६ फेऱ्या

पहिल्या टप्प्यात NMIA-दादर आणि CSMT मार्गावर दररोज १६ फेऱ्या, बोरिवलीसाठी ८, तर पुणे स्वारगेटसाठी २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या बस अटल सेतूसह मुंबईतील प्रमुख मार्गांवरून धावतील.

NMIA-CSMT-दादर मार्गावर उलवे, न्हावा-शेवा, चिर्ले, अटल सेतू, शिवडी, ईस्टर्न फ्रीवे, भायखळा, परळ आणि लालबागमार्गे बससेवा असेल. बोरिवली मार्गावर अटल सेतू, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सायन, विमानतळ टर्मिनल-१, JVLR, अंधेरी आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे बस धावणार आहेत. पुण्यासाठी स्वारगेटपर्यंत थेट सेवा उपलब्ध असेल.

भाडे परवडणारे

NMIA ते दादर १७० रुपये, बोरिवली २१० रुपये, तर पुणे स्वारगेटसाठी ४५५ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

परिवहनमंत्री सरनाईक यांनी NMIAला MSRTCच्या व्यापक वाहतूक नेटवर्कशी जोडल्याने मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि राज्यातील अन्य भागांतील प्रवाशांना सुरक्षित व किफायतशीर प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, ठाणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील अन्य शहरांसाठीही बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित असून, आगामी काळात NMIAची सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी आणखी विस्तारण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT