Nagaon Beach Water Car Alibag Pudhari
रायगड

Nagaon Beach Water Car Alibag: नागाव समुद्रकिनारी ‘वॉटर कार’चा थरार; लाटांवर कार चालवण्याचा नवा अनुभव

अलिबाग पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाची झेप; उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते हायस्पीड वॉटर टॅक्सीचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

पर्यटकांना समुद्राच्या लाटांवर कार चालवण्याचा थरारक अनुभव घेता येणार

नागावच्या सागरी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा प्रयत्न

रायगड : कोकणच्या किनारपट्टीवरील अलिबाग जवळच्या सुप्रसिद्ध नागाव समुद्र किनाऱ्यावरील पर्यटनाला आता अधिक ग्लॅमर मिळणार आहे. मुळातच पर्यटकांच्या मनात स्थान मिळवलेल्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर लाटांवर हायस्पिड वॉटर टॅक्सी धावणार असून तीचे लोकार्पण उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे पर्यटकांना आता समुद्राच्या लाटांवर कार चालवण्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे.

यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.नागाव येथे हिरानंदानी कम्युनिटीजचा एकात्मिक कोस्टल टाऊनशिप प्रकल्प साकारत आहे. याच प्रकल्पाच्या अनुषंगाने सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ही विशेष हायस्पिड वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. ही कार दिसायला एखाद्या आलिशान स्पोर्ट्स कारसारखी असून ती पाण्यात अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे धावते. ही वॉटर कार समुद्राच्या लाटांवर धावताना पाहून सर्व उपस्थित सुखावून गेले होत.

पर्यटनाच्या मोठ्या संधी, स्थानिक रोजगारावर भर

हायस्पिड वॉटर टॅक्सी लोकार्पणाच्या निमीत्ताने बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, अलिबागमध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. सध्या लोकांना रोजगारासाठी मुंबई किंवा अन्यत्र जावे लागते, मात्र अशा उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. अटलसेतू आणि नवीन जेट्टींमुळे अलिबागची कनेक्टिव्हिटी वाढली असून, येथील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला अधिक सक्षम करणे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी अखेरीस सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT