Murud Tourism Summer Pudhari
रायगड

Murud Tourism Summer: आल्हाददायक हवामानामुळे मुरुडला पर्यटकांची पसंती; समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे फुलली

वीकएण्ड व उन्हाळी सुट्टीचा लाभ; जंजिरा किल्ल्यासह पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड शहरात सकाळी थंडी तर दुपारी गरम असे वातावरण असल्याने रविवार सट्टीतपर्यटक मुरुडच्या किनाऱ्यावर येणे पसंत करत आहेत. ताजी मासळी खाण्यासाठी व सुकी मासळी खरेदी करणायसाठी पर्यटक मुरुडला येतात.परीक्षा संपल्याने मुंबई पुणेसाठी सगळ्यात जवळ असणारे मुरुड पर्यटकांना आवडते.

उन्हाळी सुट्टीत विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी राहणार आहे,लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात वातावरण आल्हाददायक व सुंदर आहे.समुद्रातील वातावरण खराब असल्याने मासेमारी कमी होते.

मुरुड समुद्रकिनारी असलेली हॉटेल उन्हाळी सुटीसाठी सज्ज झालीत.सर्व हॉटेल रंगरंगोटी,विविध रंगाची रोषणाई,नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टॉल,समुद्रावर घोडेसवारी,मोटर बाईक,पाणीपुरी,भेळपुरी अशा विविध स्टॉल्सनी किनारा बहरला आहे.

नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेल्या विश्रामधामया बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ येणाऱ्या पर्यटकांना होत आहे.पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छता करतात,मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्ममदुर्ग पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत.

मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धरण,कुडे मांदाड लेणी,खोकरी,दत्तमंदिर या पर्यटन स्थळांवर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल करण्यात आलेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मुरुड तालुका फुलून गेला आहे.

पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटीचे भान ठेऊन समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रविवार सुट्टीसाठी मुरुड तयार आहे. पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते, व समुद्रकिनारे स्वच्छता, याकडे जातीने लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही.
सचिन बच्छाव, मुख्याधीकारी, मुरुड नगर पालिका
गेली 2 वर्षे कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय डबघाईला आला होता.यावर्षी उन्हाळी सुटीत बुकींग चांगले आहे.पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मुरुडला यावे,आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ व हॉटेल भाडे देखील योग्य दरात घेऊ.पर्यटकांनी 4 दिवस राहण्यासाठी यावे.
किशोर धमसकर, हॉटेल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT