Janjira Jetty Project Pudhari
रायगड

Janjira Jetty Project: जंजिऱ्याच्या नवीन जेट्टीचे उद्घाटन कधी?; पर्यटक आणि बोटचालकांची प्रतीक्षा

मुरुडमधील पर्यटन व्यावसायिकांचा सवाल; गेल्या दहा महिन्यांपासून प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

जंजिरा व पद्मदुर्ग किल्ल्यात जाण्यासाठी नवीन जेट्टी बांधण्यात आली आहे. या नूतन जेट्टीवर दोन हजार पर्यटक उभे राहण्याची सोय असल्याने पर्यटकांसाठी हा प्रवास सुखकर आहे. परंतु जेट्टी पूर्ण होऊन 10 महिने झाले मात्र पर्यटकांसाठी खुली होत नसल्याने पर्यटक व बोट धारक नाराज आहेत.

मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी 3 ठिकाणहून बोटींची जनवाहतूक होते. राजपुरी जेटीवरून, खोरा बंदर आणि दिघी जेट्टीवरून पर्यटन बोटीने किल्ल्यात दाखल होतात. एक सोबत एक हजार पर्यटक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरणे कठीण होते. गर्दीमुळे पर्यटकांना बोटीतच बसावे लागते.

मुरुड राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांनसाठी मुख्य आकर्षण आहे. हा किल्ला समुद्रात असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी शिडाच्या बोटीने जावे लागते परंतु किल्लांच्या प्रवेश व्दारावर समुद्राच्या लाटांचा मारा कधी कधी जास्त होत असल्याने बोट चालकांना बोट लावते वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याबरोबर पर्यटकांनाही बोटीतून उतरताना मोठे कठीण जायचे. काहीजण पर्यटक उतरताना पडून जखमी होऊ लागल्याने किल्ल्यावर अद्यावत जेट्टी

असावी अशी मागणी सर्वंच स्थरावर होऊ लागल्याने राज्य शासनाने सागरमाला योजनेंतर्गत 93.56 कोटी खर्चून अद्यावत जेट्टीला मान्यता सप्टेंबर 2022 दिली होती. त्या जेट्टीचे काम 2025 ला पूर्ण झाले पण उद्घघाटनचा मुहूर्त मिळत नाही. येथे आलेले पर्यटक हितेंद्र पंड्या यांनी सांगिले की, आम्ही सर्व कुटुंब घेऊन जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतो परंतु तिकीट काढायला रांगा पाहून वाईट वाटते. जर नूतन जेट्टी सुरु झाली तर एप्रिल व मे महिन्यात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हा प्रकल्प सागरमाला अंतर्गत येत असल्याने झालेल्या कामाचे ऑडिट रिपोर्ट मुंबई कार्यालयातून मिळण्यासाठी पाठवण्यात आला आहे. आमचे काम पूर्ण झाले आहे. उदघाटन लवकर होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
प्रवीण पाटील, उपअभियंता, मेरीटाईम बोर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT