पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडलाही कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या जाणवत आहे.सद्यस्थितीत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडसह घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकारघेऊन डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
मुरुड जंजिरा न.प. हद्दीचे क्षेत्र हे 3.63 चौ.कि.मी.चे आहे. शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12, 226 ऐवढी आहे. न.प. हद्दीमध्ये कचरा संकलीत करण्यात येणाऱ्या घरांची संख्या 2809 आहे. शहराला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्याची अंदाजे लांबी 3 कि.मी. आहे. मुरुडला जंजिराकिल्ला पाहण्यासाठी वर्षालासुमारे5 लाखपर्यटकांची संख्याआहे. मुरुडचा निसर्ग पाहण्यासाठी व समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी व मुरुडला 2 दिवस राहणारे पर्यटकांची संख्या वर्षाला 1 लाख 25 हजार असल्याने 2809 च्याघरात निर्माण होणार कचरा व 6 लाख पर्यटक फिरताना होणार कचरा उचलण्याची व विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुरुड नगर पालिकेकडे आहे.
कचरा उचलण्याची सुविधा पुरेशी आहे. परंतु पुढील काळात पर्यटकसंख्या वाढणार आहे, त्याचा विचार करून अद्यावत नियोजन करण्याची गरज आहे. नगरपरिषदेच्या एकूण 3 घंटागाडी मार्फत शहरातील सर्व घरामंधील कचरा संकलीत करण्यात येतो तसेच बाजारपेठ येथे सकाळी व रात्री कचरा गोळा करणे व रस्ते सफाई वेगळ्या वाहनाद्वारे करण्यांत येते. शहरातील रस्ते सफाई करणे व कचरा उचलणे या करिता प्रत्येक भागात कर्मचारी असून गोळा केलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलण्यात येतो. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी देखील रोज सफाई करता सफाई कर्मचारी अचूक तेथील कचरा उचलण्याकरीता वेगळे वाहन ठेवण्यात येतो.
नगरपरिषदेच्या घंटागाडीव्दारे घराघरातील गोळा करण्यात येणारा कचरा हा ओला व सुका या वर्गीकृत स्वरूपात गोळा करण्यात येतो व वर्गीकृत स्वरूपात कचरा देण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येते.तसेच कचरा डेपोवर देखील येणान्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते त् त्याचप्रमाणे ओला कचरा वेगळा करून त्या कचऱ्यापासून खत निर्मीती केला जातो. सांडपाण्याचा प्रश्न हा उद्भवत नाही कारण प्रत्येक घराच्या मागे वाडी असल्याकारणाने सांडपाणी हे वाडीतल्या खड्ड्यामध्ये जाते.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कागदावरच
घनकचरा व्यवस्थापनेकरीता नगरपरिषदेची मौजे तेलवडे येथे 82.9 गुड्डे जागा आहे तेथे नगरपरिषदेने कचरा वर्गीकरण खत प्रकल्प करीता शेड बांधली असून त्यामध्ये कचरा वर्गीकरण व प्रक्रीया याकरीता श्रेडर, कंपोस्टर, स्किनींग मशीन, बेलींग मशीन यासारख्या मशनरी उपलब्ध आहेत. यामधून निर्माण होणरे खत व कचरा वेगळा करून मिळणारे भंगार यांची विक्री नगरपरिषदे मार्फत करण्यांत येते.परंतु हा प्रकल्प गेली अनेक वर्ष बंद होता.
आता पुन्हा नवयाने योजना आणूं सुरु करण्यात आलेला घनकचरा प्रकल्प पुन्हा बंद झाला आहेे, ही योजना फक्त कागदावर आहे,फक्त कचऱ्याचा ढिगारा आहे,कोणतेही खात बनत नाही,त्यापासून पालिकेला 1 पैशांचे उत्पन्न नाही . याची करणे शोधणे गरजेचे आहे,शाहसनचे पैसे येतात नाही योजना पूर्ण का होत नाही सुरवात चांगली हते,नंतर आलेल्या मशीन गंजून फुकट गेल्या असे पाहायला मिळते,कुठेतरी नियोजनाची गरज आहे.
मुरुड न.पा.चा घनकचरा प्रकल्प केलवडे येथे आहे. तो गेली अनेक वर्ष पूर्ण कार्यान्वित नाही परंतु आता शासनाचा निधी उपलब्ध झाल्यामुळे प्लास्टिक पॅकेजिंगचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्लास्टिकचे मोठे बंदर करून विकण्यात येणार आहे. परंतु कचऱ्याचा खताचा प्रकल्प अजूनही सुरू झाला नाही त्यासाठी न.पा.चे प्रयत्न राहतील.राकेश पाटील, पालिका आरोग्य निरीक्षक