Murud Coconut Farmers Pudhari
रायगड

Murud Coconut Farmers: मुरुडमधील नारळ बागायतदार नैराश्‍येच्या छायेखाली; माकडांचा उच्छाद

नारळ छोटे असतानाच खाल्‍ल्यामुळे उत्पादन झाले कमी; बागायतदार हैराण

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा: कोकण हा नारळ-सुपारीच्या बागांमुळे जग प्रसिद्‍ध आहे. मुरुड तालुक्यातील नारळाला मुंबईत चांगला भाव मिळत होता. बागायतदार खुश होते. परंतु २०२१ ला वादळ मुरुड अलिबाग किनाऱ्यावर धडकले आणि कोकणातील बागायतदारांच्या बागेतून लाखो नारळ व सुपारीची झाडे कोसळली आणि बागायतदारांचे भविष्य अंधारमय झाले आहे.

शासनाने रायगडचा सर्वे केला आणि खूप उशिराने मदत जाहीरकेली, ती पण एका झाडाला ६०० रुपये. खरतर ते मोडलेले झाड मुळापासून काढण्यासाठी मालकाला २२०० रुपये खर्च आला. 

नवीन नारळ लावल्यानंतर १० वर्ष उत्पनासाठी वाट पाहायची आहे. त्यामुळे नाराज झालेल्या नारळ बागायतदाराने निराश होऊन बागायत करण्याचे सोडून दिले. नारळाची झाडे कमी झाल्याने नारळ पाडेकरी काम सोडून गेले. 

पाडेकरी मिळत नसल्याने नारळ उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यात वर्षभर माकडांची टोळी येते आणि छोटे नारळ खाऊन खाली पडते. नारळ झाडावर मोठे होऊच देत नाही. सुपारीचे पेंड कच्‍ची असतानाच पाडतात आणि नाश करतात. माकडांवर शासन कोणतेही नियंत्रण करत नसल्याने मुरूडचे बागायतदार नैराशेच्या छायेत आहेत.

रायगडात नारळापासून माडी बनवण्याचा व्यवसाय जोरात होता. परंतु वादळानंतर माडी होणारे नारळ झाडे मोठ्याप्रमाणात पडल्याने माडी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यात माडी मादक पेयामध्ये मोडत असल्याने अधिकृत विक्रीच्या परवाने मिळण्यास शासनाची कठोर नियम माडी उपदकांना त्रासदायक ठरू लागले. 

खरतर मुरुडची माडी हि जग प्रसिद्ध मुंबईत रोज एसटीच्या तापावर २० द्रॅम माडी विक्रीसाठी जात असत तेवढी मागणी होती, परंतु शासनाची परवाने बाबत धोरणे कठोर व जाचक असल्याने मुंबईत जाणारी माडी बंद झाली. 

माडी काढणारे मिळत नसल्याने माडी व्यवसाय डबघाईला आला आहे. नारळच्या पाण्याचे फायदे सांगण्याची गरज नाय कारण प्रत्येकाला माहिती आहे कि नारळाचे पाणी हे आपल्या शरीराला उपयगी असते. 

नारळाच्या झाडापासूनभुसा दोरी, फिशिंग नेट, ब्रशेस आणि गाभाळ घालण्यासाठी वापरला करण्यात येतो, आणि तो इंधन स्त्रोत म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. उर्वरित झाडाचा वापर देखील केला जाऊ शकतो.

 हे सर्व फायदे नारळाच्या झाडापासून मिळवता येतात परंतु ग्रामीण भागात अद्यावत मशीन व यंत्राची कमी व शासनाच्या नियोजन व माहिती लोकांपर्यंत पोहच नसल्याने व विविध व्यवसाय करण्यासाठी सहज मिळणारे कर्ज बागायतदारांना मिळत नसल्याने निराश झालेला बागायतदार शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे.

आमच्या ४ पिढ्या नारळ सुपारीच्या बागांवर उपजीविका करत होत्या, परंतु २०२१ ला झालेल्या वादळात आम्ही पूर्णपणे उद्ध्व‍स्त झालो आहोत. आमच्या वाडीतील वादळात १२ नारळ व २५० सुपारी झाडे मोडलीत. शासनाने मदत दिली मात्र ती अल्प असल्याने नारळ झाडे पुन्हा लावण्याची हिंमत होत नाही. मोडलेल्या झाडांना कापून त्याजागेत व्यावसायिक इमारत बनवत आहे. पूर्वीसारखे नारळ सुपारीच्या बागा फुलवण्यासाठी शासनाने नियोजन बद्ध लागवडीच्या योजना ग्रामीण भागात राबवणे गरजेचे आहे.  तसेच माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.
उदय दांडेकर, बागायतदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT