Mumbai Pune Expressway accident pudhari photo
रायगड

Mumbai Pune Expressway accident : एक्स्प्रेस-वेच्या मुंबई लेनवर दोन ट्रकची धडक

खंडाळा घाटातील अपघात; चालकासह क्लिनर जखमी; वाहतूक सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेच्या मुंबई लेनवर खंडाळा घाटाच्या हद्दीत किलोमीटर ३९/४०० येथे ५ ऑक्टोबर सकाळच्या सुमारास ट्रकचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने एका ट्रकने त्याच्यापुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर जखमी अवस्थेत अडकून पडले होते त्यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.

एक्स्प्रेस वेच्या खंडाळा घाटात दोन ट्रकची पाठीमागून धडक देऊन अपघात घडला. या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकमधील चालक आणि क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना बाहेर काढून एकाला प्राथमिक उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्याला एमजीएम हॉस्पिटल, कळंबोली येथे नेण्यात आले.

या दोन्ही जखमींची नावे समजू शकले नाहीत तर अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम शर्तीचे प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नव्हता. वाहतूक सुरळीत होती. तर अपघाताची माहिती मिळताच संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होत मदतकार्य व अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम केले. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वारंवार होणारे अपघात वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनले आहेत. या मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, अचानक लेन बदलणे, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे तसेच अवजड वाहनांची वर्दळ यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. अपघातांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच जीवितहानी व आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सतर्कतेने वाहन चालविणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT