fungus in Basundi : पनवेलमध्ये बासुंदीत आढळली बुरशी

अन्न व औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी
fungus in Basundi
fungus in Basundipudhari photo
Published on: 
Updated on: 

नेरळ : पनवेल येथील एका या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या अंगूर बासुंदीत बुशी आढळल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.

कर्जत मधील दहिवली येथील एका चिमुकलीने व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सदर मुलीच्या वडिलांनी पनवेल येथील एका मिठाईच्या दुकानातून विविध प्रकारची मिठाई खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

fungus in Basundi
Raigad chemical waste : खोपटाजवळील खाडीत रसायनांच्या गोणी

यामध्ये खरेदी केलेल्या अंगूर बासुंदीमध्ये बुशी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर चिमुकलीने या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करून संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील दहिवली येथील एका चिमुकलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news