Urban Transport Hub File Photo
रायगड

Urban Transport Hub: चिखलोली ठरणार भविष्यातील ‌‘ट्रान्स्पोर्ट हब‌’

ठाणे-भिवंडी-कल्याण मार्ग 5 विस्ताराची चर्चा; मेट्रो कनेक्टिव्हिटीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

चिखलोली: मुंबई मेट्रो मार्ग 5 चा विस्तार चिखलोली व पुढे बदलापूरपर्यंत करण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे चिखलोली पूर्व भागाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे चिखलोली हे भविष्यातील ट्रान्स्पोर्ट हब ठरणार आहे.

सध्या चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू असतानाच, संभाव्य मेट्रो विस्तारामुळे येथील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल होऊ शकतो. या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी अद्याप मिळालेली नसली, तरी नियोजन पातळीवरील हालचालींमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या शक्यतेमुळे चिखलोली पूर्व परिसरात रिअल इस्टेट व व्यावसायिक गुंतवणुकीला अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाकडून कल्याण-डोंबिवलीच्या धर्तीवर नियोजित विकासाचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

चिखलोली पूर्वचे वाढते महत्त्व पाहता, दुहेरी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने रेल्वे आणि मेट्रो दोन्ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. येथील विकासामुळे प्रॉपर्टी बाजारात हालचाल सुरू झाली असून घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल येथे दिसून येणार आहे.

यासाठी चिखलोली पूर्व परिसराला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचे संकेत आहेत. चिखलोली पूर्वच्या भविष्यातील विकासकामांना मिळणारी चालना पाहता येथील तरुणांना रोजगार संधी प्राप्त होणार आहे. चिखलोली स्थानक परिसरामध्ये व्यावसायिक संकुल, सेवा क्षेत्र वाढण्याची शक्यता येथे आहे. चिखलोली रेल्वे स्थानकाचे वेगाने सुरू असलेले काम, रेल्वेसोबतच मेट्रोची कनेक्टिव्हिटी लक्षात घेता चिखलोली परिसराला एक आगळे रूप प्राप्त होणार आहे.

मेट्रो विस्ताराचा विचार लक्षात घेऊन चिखलोली येथील रस्ते, पाणी व वीज या मूलभूत सुविधांवर भविष्यात अधिक भर दिला जाऊ शकतो. यामुळे मूलभूत सुविधांमुळे येथील विकासाच्या टप्प्यात असलेल्या चिखलोली परिसराला आधुनिक स्वरूप निर्माण होणार आहे.

या परिसरात मेट्रो सेवा सुरू झाल्यास

चिखलोलीचा विकास वेगाने होणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवासदेखील सुलभ होऊन रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढतील, असे मत येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मेट्रो विस्ताराची घोषणा बाकी...

कल्याण ते बदलापूर हा पट्टा नियोजित शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मेट्रो विस्ताराबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. मात्र, यामुळे चिखलोली पूर्व परिसर हा भविष्यातील महत्त्वाचा ट्रान्स्पोर्ट हब म्हणून उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT