RoRo ferry fare hike Pudhari
रायगड

RoRo ferry fare hike: मुंबई ते मांडवा रो-रो फेरी सेवेचे तिकीट दर वाढण्याची शक्यता

आखाती देशांमधील युद्ध तणावामुळे इंधनाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम सागरी वाहतुकीवरही होऊ लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: मुंबई ते मांडवा रो-रो फेरीचा प्रवास, नियमित प्रवासी आणि पर्यटकांच्या सोयीचा असला तरी इंधन दरवाढीमुळे या रो-रो सेवेच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आखाती देशांमधील युद्ध तणावामुळे इंधनाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम सागरी वाहतुकीवरही होऊ लागला आहे.

अलिबागकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई ते मांडवा रो-रो सेवा ही सोयीस्कर आहे. प्रवाशांना त्यांच्या वाहनासह प्रवास करता येत असल्याने ही सेवा महत्वपूर्ण ठरली आहे. मात्र डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने या सेवांचा खर्च आता वाढला आहे. रोराच्या एका फेरीला 2000 लिटर इंधन लागते.यामुळे कंपन्यांचा भाडे वाढवण्याचा विचार सुरु आहे.

सद्यस्थितीत इकॉनॉमी क्लासचे तिकीट 400 रुपये, प्रिमियम/लाऊंज तिकीट 500 रुपये आणि पाळीव प्राण्यांसाठी 310 प्रति पाळीव प्राणी तिकीट आहे. वाहनाचे स्वरूप आणि आकारानुसार वाहनांचे तिकीट दर असून, त्यात दुचाकी 210, सायकल 110. लहान कार 1,020 पासून सुरू, मोठी कार 1,200 ते 1,500 पर्यंत. मोठी वाहने व बस 4,500 रुपये पासून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT