Mumbai Goa National Highway Pudhari
रायगड

Mumbai Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गावर गचके, लाईट बंद; पोलादपूरजवळ पादचारी पुलाचे काम रखडले

कशेडी बोगदा मार्गे 9 मिनिटांत घाट पार; मात्र जोडरस्त्यांवरील लेव्हल बिघडल्याने वाहनचालक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली अनेक वर्षे रखडलेले रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. पूर्ण झालेल्या सिमेंटकाँक्रीटीकरणाचे काम समांतर नसल्याने अनेक ठिकाणी जोरदार वेगाने मार्गस्त होणाऱ्या कारसह दुचाकी मोठी वाहने यांना गचेक सहन करावे लागत आहेत, तर कशेडी बोगदामधील दोन्ही मार्गिकामधून वाहतूक सुसाट होत आहे, मात्र रात्रीच्या वेळी भुयारी मार्गवरील लाईट सुरू आहे, मात्र बाहेरील जोड मार्गवरील दोन्ही बाजूच्या लाईट बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पोलादपूरनजीक पादचारी पूलाचे काम रेंगाळले आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना बस स्थानकापर्यंत अथवा दुभाजक ओलांडून जावे लागत आहे.

नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक, सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी, यामुळे खडतर झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास हा नव्या तंत्रज्ञानाचा सदुपयोग करत बोगद्याच्या निर्मिती करण्यात आली. रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते 26 जानेवारीला 2019 मध्ये कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत करण्यात आला होता. या भुयारी मार्गिकेमुळे प्रवासीवर्गाचा 45 मिनिटांचा घाट प्रवास सरळसोट मार्गिकेद्वारे 09 मिनिटात पूर्ण होत आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा-वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. असे असले तरी बोगद्याच्या दोन्ही बाजूला असणारे रस्त्यावर अनेक पूल व मोरीवरील रस्त्याच्या कामात समांतर नसल्याने वाहनांना ब्रेक लावला लागत आहे.

दोन्ही बोगद्यांची तोंडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी गावच्या हद्दीत उघडत असून, कशेडी बोगद्यांपासून हॉटेल अनसूया फाट्यापर्यत लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट अध्याप बंद असल्याने रात्री या मार्गवर अंधार दिसून येत आहे, त्यातच खेड हद्दीतील काही ठिकाणी काम सुरू असल्याने अडथळे उभारण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड विभागातील नडगाव ते राजेवाडी फाटा येथील उड्डाणपूलावर सुद्धा लेव्हल नसल्याने प्रवासादरम्यान गचके सहनकरावे लागत आहेत, तर त्यापुढे लोहारे येथील उड्डाणपूल येथे सुद्धा 1 ठिकाणी हीच परिस्थिती राहिली आहे. पोलादपूर शहर व त्यापुढील कशेडी पर्यंतचा महामार्ग परिपूर्ण असला तरी भोगाव ते कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत मार्गावर असणाऱ्या पूलाजवळ लेव्हल नसल्याने व कमी अधिक उंचवटा असल्याने अनेकदा वाहनांना ब्रेक लावावा लागत आहेत. काही सद्य स्थितीत सर्वच वाहने वेगाने मार्गस्त होत आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर पोलादपूर शहरामध्ये अंडरपास रस्ता गेल्यानंतर शहराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असलेल्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पायी चालत जाताना धोका निर्माण झाला आहे त्याच प्रमाणे या भागात राहणाऱ्या नागरिकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉस करावा लागत आहे त्याच प्रमाणे महामार्ग वरील अनेक गावातील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी किंवा पलीकडे जाण्यासाठी महामार्ग चा अडथळा पार करावा लागत या बाबत अनेकदा मागणी करून आज पर्यंत स्कायवॉक चा प्रश्न सुटला नाही दरम्यान यशवंत इंग्लिश शाळा कडे जाणाऱ्या बाजू कडे महामार्ग च्या सर्व्हिस रस्ता बाजूला लोखंडी शिंगा वापरून पादचारी पूल च्या कामाला सुरुवात केली खरी मात्र अद्याप काम रेंगाळले दिसून आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT