mumbai goa highway news Pudhari
रायगड

mumbai goa highway news: खैरवाडीतील आदिवासींच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर; खा. तटकरे आज घटनास्थळी पहाणी करणार

अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नागोठणे शहर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे खैरवाडी परिसरातील आदिवासी ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रस्ता क्रॉसिंगच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे स्वतः 25 एप्रिल सकाळी 10 वाजता खैरवाडी बस स्टॉपवर भेट देणार असून संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी आदिवासी समाजाचे नेते जानू वरगुडे व भगवान शिद यांच्यासह खैरवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते दिलीप टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान शिद, सामाजिक कार्यकर्ते जानू वारगुडे आदींसह खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी, उसर नंबरवाडी या भागातील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सुकेळी विभागातील खैरवाडी हद्दीतील वाघ्रणवाडी, मांडवशेत, नंबरवाडी व उसर या आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांना आपल्या वाड्यांकडे जाण्यासाठी आता तब्बल 2 किमी अंतरावरून रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यापूर्वी हा मार्ग अवघ्या 100 मीटर अंतरावर उपलब्ध होता.

पावसाळ्यात रस्त्यालगतचा नाला तुडुंब भरत असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. या गंभीर समस्येबाबत आदिवासी नेते जानू वरगुडे व भगवान शिद यांनी जवळपास 100 ग्रामस्थांसह राष्ट्रवादीचे नेते दिलीप टके यांच्या नेतृत्वाखाली खासदार तटकरे यांची भेट घेतली. समस्या ऐकताच तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेश देत स्वतःही भेट देण्याचा निर्णय घेतला.

आम्हाला गावात ये-जा करण्यासाठी मोठा फेरा मारावा लागतो. पावसाळ्यात नाला भरल्यावर परिस्थिती अधिकच बिकट होते. यावर तात्काळ उपाययोजना करावी,‌’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या वेळी शिवराम शिंदे, सदानंद गायकर, भगवान शिद, जानू वरगुडे यांच्यासह खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी, उसर, नंबरवाडी येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आदिवासांच्या समस्या दूर होणार

समस्यांबाबत आदिवासी नेते जानू वरगुडे व भगवान शिद यांनी जवळपास 100 ग्रामस्थांसह राष्ट्रवादीचे नेते दिलीप टके यांच्या नेतृत्वाखाली खासदार तटकरे यांची भेट घेतली. समस्या ऐकताच तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेश देत स्वतःही भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासींच्या समस्या दूर होणार आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT