Mora Ro Ro service delay Pudhari
रायगड

Mora Ro Ro service delay: मोरा-मुंबई रो-रो सेवा पुन्हा रखडली; एप्रिल अखेरचा मुहूर्तही हुकला

काम पूर्ण होण्यास लागणार विलंब

पुढारी वृत्तसेवा

उरण: बंदर ते मुंबईच्या भाऊचा धक्का दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रो-रो सेवेचे अनेक वर्षे रखडलेले काम आता एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र एप्रिल 2026 चा मुहूर्तही आता टळला आहे.

उरणहून मुंबईपर्यंत जलसेवा सुरूच आहे. मात्र या मार्गाने वाहन घेऊन प्रवास करता यावा याकरिता रो रो सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. गेले अनेक महिने रखडलेले हे काम हे काम एप्रिल 2026 ला पूर्ण करण्यात येणार होते.

काम रखडल्याने 50 कोटींचा खर्च 75 कोटींवर पोहचला आहे. सध्या जेट्टीवर केवळ एक सांगाडा तयार आहे. पुन्हा एकदा सुरू करण्यात आले होते. हे काम एप्रिल 2026 ला पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सध्या या जेट्टीवर केवळ एक सांगाडा तयार करण्यात आला आहे.

75 कोटी खर्चाचे रो-रो सेवेचे काम अनेक अडथळ्यांमुळे 2018 पासून संथगतीने सुरू आहे. मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला वेग आला होता. सातत्याने होणाऱ्या या जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे.

यातील रेवस जेट्टीच्या कामात पाच कोटींच्या खचांर्चात वाढ झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचे काम करण्यात येत आहे. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

जेट्टीच्या खर्चात 25 कोटींची वाढ

मोरा जेट्टीचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखडल्याने 50 कोटींच्या कामाची रक्कम 75 कोटींवर पोहचली आहे. तरीही जेट्टीचे काम अपूर्णच असून जेट्टी पर्यंत जाण्यासाठी मार्ग ही होऊ शकलेला नाही. हे काम वारंवार बंद होऊन रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणार का असा सवाल आता या मार्गावरील प्रवासी करू

मोरा मुंबई रो-रो जेड्डीचे काम 38 टक्के पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे. येत्या डिसेंबर 2026 पर्यंय या जेट्टीचे काम पूर्ण करून ही सेवा नव वर्षात सुरू करण्याचा मानस
- अजय यादव, उपअभियंता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT