Matheran Tourism decreased Reason Explained
माथेरान : मिलिंद कदम
प्रदूषण मुक्त पर्यटन स्थळ म्हणून माथेरान ला अनेक वर्षापासून पर्यटकांची पहिली पसंती आहे, माथेरानचा शोध लागल्यापासून माथेरान आपले वेगळेपण जपण्यामधे यशस्वी झाले होते, त्यामुळेच प्रदूषण मुक्त वातावरणामध्ये राहण्याकरता अनेक धनाढ्य पर्यटक काही वर्षांपूर्वी येथे आठ ते दहा दिवस राहण्याकरता येत असत परंतु आता माथेरान चे पर्यटन फक्त एक ते दोन दिवसांचे झाले असून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या दर्जाही खालावला असल्याने अनेक धनाढ्यांनी माथेरान कडे पाठ केल्याचे चित्र असून स्थानिक नागरिकांनीही हा बदल स्वीकारल्याचे दिसत असल्याने येणाऱ्या काळात माथेरान एक दिवसीय पर्यटन स्थळ म्हणून गर्दीचे ठिकाण झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
माथेरानचा इतिहास
1850 साली ब्रिटिश राजवटीमध्ये जे दोन शेवटची पर्यटन स्थळे विकसित केली गेली त्यामध्ये पांचगणी येथे वाहनांना परवानगी दिली गेली तर माथेरान या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदीचा कायदा केला गेला. फार पूर्वी या गोष्टीचा अभिमान होता वाहन विरहित पर्यटन स्थळ माथेरान तीच गोष्ट या आधुनिक काळात माथेरानला मारक ठरत होती कारण फक्त आणि फक्त वाहन व्यवस्थेमुळे माथेरानच्या बरोबर उदयास आलेली पर्यटन स्थळे उच्च दर्जाच्या पर्यटकांकरिता नंदनवन ठरत होती तर त्याच वेळी माथेरान मधील जुने बंगलीधारक व हॉटेल व्यवसायिक आपले बंगले हॉटेल विकून शहरांमध्ये स्थलांतरित होत होते, ही तीच मंडळी आहे की ज्यांनी माथेरानचे पर्यावरण अबाधित रहावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु आपल्या मुलांच्या शिक्षणाकरिता त्यांनी शहरांचा रस्ता धरला परंतु येथील कष्टकरी स्थानिक याला शहरातील शिक्षणाचा खर्च पेलवणारा नव्हता त्यामुळे तो माथेरानमध्ये घोडा व हात रिक्षा यांच्या दुष्टचक्रात फसला गेला.
या दरम्यान माथेरान मधील पर्यटन वाढले होते परंतु या येणाऱ्या पर्यटकांचा दर्जा मात्र खालावू लागला होता. खर्चिक पर्यटक महाबळेश्वर, पांचगनि, लोणावळा खंडाळा, तोरण माळ, गोवा मनालीकडे आकर्षित झाले त्यामुळे येथील स्थानिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरता आपल्या व्यवसायाशी तडजोड करावी लागली व ती आता सवयच लागून गेली आहे.
येथील बोटिंग सर्वात मोठे आकर्षण आहे परंतु माथेरानमध्ये फक्त आणि फक्त राजकारणापुरताच नगरपालिका अस्तित्वात आहे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता कोणताही प्रयोग राबविलला दिसत नाही, येथील प्रदूषण मुक्त हवा व त्या निगडित पर्यटन पूरक सुविधा यांचा अभाव त्यामुळेच आगामी काळामध्ये पर्यटकांना सुविधा दिल्या नाहीत तर माथेरान हे फक्त आणि फक्त एक दिवसाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होईल यामध्ये शंका नाही.