मिलिंद कदम
माथेरान ः माथेरान नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून एकूण दहा प्रभाग व 20 उमेदवार असलेल्या नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व राखले असून तब्बल पंधरा जागेवर विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 12 नगरसेवक तर भाजपाचे तीन नगरसेवक निवडून आले आहे. ठाकरे गटाकडून एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून चार नगरसेवकांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. सौ प्रतिभा घावरे व श्री शिवाजी शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक केली. ही यावेळी पूर्ण रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.
पहिल्या फेरीपासूनच नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांनी आघाडीघेतली.शिवाय अन्य नगरसेवकांनाही चांगलीआघाडी मिळत गेली.अखेर नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार .चंद्रकांत चौधरी 1069 मतांनी विजय मिळवित माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांचा दारुण पराभव केला आहे.सावंत हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित होते. निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
मूलभूत समस्यांचे निराकरण आवश्यक
माथेरानमध्ये आता नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांना शहराच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणे हे मुख्य काम करावे लागणार आहे.माथेरानची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावरचअवलंबून असल्याने तेथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील.शिवाय पिण्याचे पाणी,इ रिक्षा सेवा,आरोग्य आदी मुद्यावरही मोठे काम करावे लागणार आहे.सुदैवाने चंद्रकांत चौधरी हे सत्ताधारी शिवसेना(शिंदे) गटाचे नगराध्यक्ष आहेत.शिवाय भाजपची साथ शिवसेनेला असल्याने सरकारी निधी आणणेआतासहज शक्य होणारआहे.प्रचारात पर्यटनमंत्रीशंभुराज देसाई यांनी तसेआश्वासनही दिलेले आहे.