नेरळ : माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीतील असलेल्या हुत्तात्मा स्मारकाच्या कट्ट्यावर ई- रिक्षा पार्किंगसाठी केला असुन, परिसरात बकाल परस्थिती झाली आहेे. देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचे पवित्र राखण्यात माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेला विसर पडला आहे. हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर राखण्या पेक्षा अस्वच्छता व बकाल परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये माथेरानचा शोध हा मे 1850 मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यू पॉयंट्झ मालेट यांनी लावला. तर त्यावेळचे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून विकासाचा पाया घातला व इंग्रजांनी माथेरानला उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी एक लोकप्रिय रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यात आले होते.
रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातीत सह्याद्री डोंगर रांगेतील डोंगर माथ्यावर वसलेले थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण म्हणून माथेरानला ओळख प्राप्त झालेल्या माथेरानच्या भूमित 1 डिसेंबर 1912 रोजी एका न्हावी समाजातील कुटुंबात जन्माला आलेले व ब्रिटीश राजवटीच्या विरोधात असलेल्या लढ्यात स्वतःला झोकून देत देश स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक वीरभाई कोतवाल यांचे जन्मस्थान म्हणून याच माथेरानची मुख्य ओळख आहे.
देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मरणार्थ त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्या कार्यकालात राज्य शासनामार्फत स्मारक बांधले आहे. याच स्मारक परिसरात माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे माध्यमातून माथेरानमधील नागरिकांसाठी सामाजिक कार्यक्रमासाठी दीड कोटी रूपये खर्च करून कम्युनिटी सेंटर हॉलचे देखील बांधण्यात आले आहे. तर या कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये अंगणवाडी शाळा देखिल सुरू आहे.
मात्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदे कडून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाच्या कट्ट्यावर त्यांच्या मालकीच्या ई- रिक्षा पार्किंगसाठी केल्या आहे. तर कम्युनिटी सेंटर हॉल व हुतात्मा वीरभाई कोतवाल पडलेले परिसरात असताव्यस्त पडलेले साहित्य व मोडकळीस आलेल्या लोखंडी मालवाहतूक हातगाड्या आदी सामान व वस्तूनचा खच पडल्याने, हुतात्मा स्मारक परिसरातील निर्माण झालेल्या बकाल परिस्थितीमुळे सदर बकाल परस्थितीचे वास्तव हे माथेरानमध्ये जग व देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसमोर येत आहे. मात्र या बकाल अवस्थेकडे माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाचे पवित्र राखण्याचा विसर हा माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेला आहे.
या इ रिक्षा कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या सध्या कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये ट्रेनिगचे काम सुरू असल्याने, इ रिक्षा या बाहेर काढण्यात आल्या आहे. या इ रिक्षा हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे स्मारकाच्या कट्ट्यावर लावल्या असतील. तर त्या ठिकाणावरून त्वरीत काढल्या जातील.राहुळ इंगळे,मुख्य कार्यकारी अधिकारी, माथेरान नगरपरिषद,