Matheran environmental crisis pudhari photo
रायगड

Matheran environmental crisis : ग्लोबल वार्मिंगचे माथेरानच्या वनसंपदेवर परिणाम

अतिवृष्टीमुळे विशालकाय वृक्षांचे अस्तित्व धोक्यात; पर्यावरणप्रेमींकडून चिंता

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानमध्ये मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित जंगलतोड व ग्लोबल वार्मिंग यामुळे येथील निसर्गावर त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. येथे कोसळणाऱ्या जोरदार पावसाने झाडांची मुळे ठिसूल झाल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे जुने रुक्ष पडले आहेत तर मोठ्या प्रमाणात माती वाहून जात असल्याने पर्यायांना धोका निर्माण झाला आहे व ही बाब गंभीर असल्याने येथील पर्यावरण प्रेमी आत्ताच याकडे लक्ष देण्याची मागणी करीत आहेत.

मागील दोन चक्रीवादळ यांनी माथेरानच्या निसर्गाची अपरिमित हानी केली होती व त्यानंतर येथे दिवसेंदिवस वृक्षसंपदा कमी होत आहे. झाडे मुळापासून उघडल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने यावर्षी माथेरानमध्ये ही उच्चं की गर्मी पहावयास मिळाली होती व यावर्षी पर्जन्यमान ही घटल्याने पर्यटनावर मोठे संकट येऊन ठेवले आहे.

अनेक ठिकाणी माती कमजोर झाल्याने झाडाची मुळे उघडी पडत आहे तर अलेक्झांडर पॉईंट या परिसरामध्ये जंगलामध्ये वाळवी लागल्याने येथील वृक्षसंपदा नष्ट होत आहे. घाट माथ्यावरील जंगले आदिवासी लोकांनी पूर्णपणे संपवण्याचा विडाच उचलला असल्याने येथेही डोंगर उघडे पडत आहे.

ही माथेरानच्या पर्यटनासाठी भविष्यातील धोक्याची घंटा आहे परंतु याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याने माथेरानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर्षी पहिल्यांदाच माथेरानमधील तापमान उच्चांकी चाळीस अंश पेक्षा जास्त नोंदले गेले व या वर्षी पाऊसही कमी झाल्याने येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये निश्चितच हा सुद्धा रेकॉर्ड तुटेल.

माथेरान वनविभाग व वन संवर्धन समितीच्या संयुक्त आयोजनातून व नगरपालिकेमार्फत अनेक ठिकाणी गॅबियन वॉल बनवून नष्ट होणारी जंगले थांबवण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. माथेरानच्या पर्यावरणाला साजेशी झाडे लावून त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे ठरणार आहे कारण दरवर्षी येथे वृक्षारोपण केले जाते परंतु त्यातील किती झाडे जगतात हा संशोधनाचा विषय आहे.

माथेरानमध्ये परिसरात जाताना अनेक ठिकाणी लाल मातीचे मोठे मोठे खाणे पाहावयास मिळाल्या, जेथून मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे व झाडेही पडली आहेत. यांना संरक्षण देऊन या परिसरातील हिरवाई टिकवणे गरजेचे आहे.
पूजा महाडिक, पर्यटक, मालाड
यावर्षी पावसाळ्यामध्ये माथेरानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे पडलेली दिसत आहेत. माथेरानमध्ये पहिल्यांदा उकाडा अनुभवायला मिळाला. त्यामुळे माथेरानच्या पर्यावरणाची निगा राखणे गरजेचे आहे.
पराग शहा, पर्यटक, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT