Matheran alternative road project pudhari photo
रायगड

Matheran alternative road project : माथेरान पर्यायी मार्ग केव्हा होणार?

पनवेल माथेरान रस्ता होवू शकतो, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

माथेरान :मिलिंद कदम

माथेरान निवडणुकी मध्ये सत्ताधारी पक्षाने माथेरान पर्यायी रस्ता व ई रिक्षा वाढ हा प्रमुख विषय घेतला होता व ज्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्य मिळून सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे परंतु आता याची पूर्तता केव्हा होणार याची वाट माथेरानकर पाहत आहेत.

माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आपल्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये धोदानी ते माथेरान फेनिक्युलर रेल्वे हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू व्हावा याकरिता पाठपुरावा केला होता परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला होता आता सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात व देशात आहे सत्तेत असल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणे महत्त्वाचे होणार आहे.

सध्या माथेरान मध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत यामध्ये माथेरानचे पर्यटन धोक्यात आल्याने माथेरानला नवीन पर्याय शोधणे गरजेचे आहे ज्याचा मुख्य आधार पनवेल माथेरान रस्ता हा होऊ शकतो परंतु या रस्त्या करीता प्रशासन उदासीन असल्याने माथेरानकर याकरिता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माथेरानची पर्यटक संख्या वाढवण्यासाठी संघटीत प्रयत्न, पर्यावरण पूरक पर्यटनस्थळाचा सकारात्मक प्रचार, उत्तम दळणवळण व्यवस्था आणि व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे त्यामुळेच पनवेल परिसरामध्ये सुरू असलेल्या विकास कामाचा फायदा पर्यटन वाढीसाठी निश्चितच होऊ शकतो. त्यामुळेच त्या दृष्टीने स्थानिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रस्तावित तिसरी मुंबई नव्याने तयार झालेले विमानतळ उरण बडोदा कॅरिडोर महामार्ग,तिसरी मुंबई सारख्या महत्त्वपूर्ण योजना सध्या पनवेल व परिसरामध्ये सुरू आहे या योजना सुरू झाल्यानंतर या परिसराला विशेष महत्त्व येणार आहे, माथेरान ही सध्या एम एम आर डीए च्या अधिकारात येत असल्याने येथेही काही महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जाऊ शकतात याकरिता माथेरान नगरपालिकेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

पालिका सभागृहामार्फत या ठिकाणी पनवेल माथेरान पर्यायी मार्ग ची मागणी साठी जोर लावल्यास माथेरान थेट नवीन विमानतळा बरोबर जोडले जाऊ शकते ज्यामुळे माथेरानमध्ये विदेशी पर्यटकांनाही येणे सहज शक्य होणार आहे जागतिक नकाशावर येण्यासाठी पर्यायी रस्ता ही आता काळाची गरज ठरत असून पनवेल माथेरान उत्तम पर्याय ठरू शकतो. पनवेल वरून कर्जत पासून पुढे माथेरानला पोहोचणे ऐवजी थेट पनवेल येथून माथेरान ला येणे सोपे होणार आहे.

अनेक वर्षापासून माथेरान कर या पर्यायी रस्त्या करिता लढा देत आहे परंतु काही राजकीय दबावामुळे या रस्त्याचे घोडे अडले असल्याचे बोलले जात आहे मागील काही वर्षां मध्ये कर्जत तालुका फार्म हाऊस संस्कृतीचा तालुका म्हणून झपाट्याने पुढे येत आहे ज्यामुळे माथेरानकरना याचा फटका पडत आहे हा रस्ता झाला तर या लोकांकडे पर्यटकांचा ओघ कमी होणार आहे

या मार्गाचे फायदे

पनवेल येथून पोहोचण्याकरिता माथेरान फक्त 30 मिनिटे लागू शकतात त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. स्थानिकांना वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा मिळणे सोपे होणार आहे. माथेरान करिता वाशी बाजारपेठ हा एक उत्तम पर्याय सुरू झाल्यास येथील भाव वाढ ही कमी होणार आहे. नेरळ माथेरान घाटामध्ये होणाऱ्या वाहन कोंडी पासून पर्यटकांची सुटका होणार आहे. गुजरात येथील पर्यटकांचा वेळ वाचून थेट माथेरान मध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT