How does pollution affect fish breeding?
जयंत धुळप, रायगड
माशाच्या एका मादीने लाखो अंडी दिली तरी त्यातील 40 ते 50 टक्के माशांच्या पिल्लांची मरतुक होऊन, जी पिल्ले जगतात, त्यांना निसर्गातील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात सागरी व खाडीतील प्रदूषण हा एक मोठा घटक आहे. याचा परिणाम माशांच्या पुढच्या पिढ्यांवर होऊन त्यांची संख्या कमी होत जाते.
सागरी मत्स्यउत्पादनात घट होत असल्याने हे प्रदूषण कमी करण्यासाठी सक्षम उपाय गांभीर्याने करणे करणे अनिवार्य आहे अशी माहिती रत्नागिरी येथील शासकीय मत्स्य महाविद्यायातील सागरी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.स्वप्नजा मोहिते यांनी दैनिक पुढारी सोबत बोलताना दिली आहे.
पावसाळ्याचा कालावधी, किनारपट्टीतील मासळीचा प्रजनन काळ असतो. म्हणूनच या कालावधीत मासेमारी बंदी असते. मासे खोल किनार्याजवळील संरक्षित ठिकाणी, विशेषतः खारफुटी क्षेत्रांमध्ये अंडी देण्यासाठी येतात. ही क्षेत्रे अंडी आणि पिल्ले यांची आश्रय स्थाने ( र्पीीीशीू रपव षशशवळपस र्सीेीपवी) म्हणून ओळखली जातात. माशांची अंडी आणि पिल्ले बदलांसाठी संवेदनशील असतात. रासायनिक, भौतिक ,जैविक बदलही त्यांना हानी पोहोचवतात, असे निरिक्षण डॉ. मोहिते यांनी पूढे सांगीतले.
पावसाळ्याच्या काळात नद्यांना पाणी वाढल्यानंतर या नद्यांच्या किनारी भागातील कारखाने उद्योगातील दुषीत रासायनीक पाणी नद्यामध्ये सोडण्यात येते. अशा घटना रायगड जिल्ह्यातील सावित्री, पाताळगंगा,कुंडलीका या नद्यांच्या बाबतीत अनूभवास आल्या आहेत. यातून नदिपात्रातील मासे मृत झाल्याच्या घटना देखील अनेकदा समोर आल्या असून काही बाबतीत पोलिसांत गुन्हे देखील झाले आहेत. हेच प्रदुषीत पाणी खाडीत आणि खारफूटी क्षेत्रात पसरुन तेथील मासे मृत होत असल्याचे निरिक्षणातून देखील सिद्ध झाले आहे.
एका मासळीने लाखो अंडी दिली तरी त्यातील 40ते 50 टक्के मृत्यू होऊन, जी पिल्ले जगतात, त्यांना निसर्गातील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात प्रदूषण हा एक मोठा घटक आहे. कारखान्यातील तसेच इतर ठिकाणाकडून येणारे सांडपाणी, प्लास्टिक वस्तूंच्या विघटनाने तयार होणारे मॅक्रो प्लास्टिक आणि यामुळे समुद्राच्या पाण्यात होणारे जैविक, रासायनिक आणि भौतिक बदल, यामुळे माशांच्या या संवेदनशील टप्प्यावर परिणाम होऊन अंडी व पिल्ले यांची मृत्यू होते. याचा परिणाम माशांच्या पुढच्या पिढ्यांवर होऊन त्यांची संख्या कमी होत जाते.