खोपोली (रायगड) : प्रशांत गोपाळे
खोपोली शहरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मंगेश काळोखे हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन मुले दर्शन, धनेश तसेच मेव्हण्यासह एकूण नऊ संशयित आरोपींना चोवीस तासात अटक करण्यात आली आहे. तर आणखी यातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद केले होते. त्यानंतर आरोपी फरार होते. या आरोपींच्या शोधासाठी रायगड पोलिसांनी पाच पथके तयार केली होती.
देवकर यांच्या विरोधात खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मानसी काळोखे यांनी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. फिर्यादी राज काळोखे यांचे चुलते तथा मयत मंगेश सदाशिव काळोखे ऊर्फ शिंदे गटाचे मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला आप्पा (वय ४५ वर्ष) हे २६ डिसेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजता वाजण्याच्या सुमारास साईबाबानगर येथून मुलीला शिशुमंदिर स्कुल, खोपोली येथे सोडण्यासाठी गेले होते ते मुलींना शाळेत सोडुन परत येत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विहारी गावातील जया बार समोरील चौकात दर्शन रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण व इतर ३ इसम यांनी अगोदर मयत यांचा पाठलाग करुन त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर त्यांच्यावर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करुन जिवे ठार मारले आणि घटनास्थळावरून फरार झाले होते.
सदरचा गुन्हा हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील स्वरुपाचा असल्याने खोपोली शहरात जनक्षोभ उसळला आणि गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी दिवसभर लावून धरली होती. पोलीस अधिक्षक रायगड आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल पाटील यांनी जनसमुदायातील लोकांना व नातेवाईकांना फरार आरोपीचा शोध घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शोध घेण्यासाठी पाच पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती.
अटक आरोपी
रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मीला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य चार आरोपी अद्याप फरार आहेत.