रोहे ः महादेव सरसंबे
रोह्याच्या सर्वांगिण विकासाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन जनतेच्या मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच विविध प्रलंबित प्रकल्पांची पूर्तता करणे,शहर स्वच्छतेबरोबरच पार्किंग,वाढते फेरीवाले,हद्दवाढ आदी समस्या सोडवून विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांपुढे आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) वनश्री शेडगे थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. शिवाय 18 नगरसेवक निवडून आल्याने गरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ता आली आहे. यापूर्वीही रोहा अष्टमी नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ता होती. अनेक विकास कामे रोहा शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून झाली आहेत. असे असले तरी काही मूलभूत समस्या आताही रोहेकरांना भेडसावत असल्याने या समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित नगराध्यक्ष वनश्री शेडगे व नवनिर्वाचित रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नगरसेवकावर आहे.
रोहा - कोलाड मार्गावर व आडवी बाजारपेठेत सातत्याने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक व शहरातील नागरिक येत असतात. दुचाकी गाडी कुठे उभे करावी हा प्रश्न त्यांना नेहमीच पडलेले असतो. बाजारात येत असताना मिळेल त्या ठिकाणी गाडी उभी करून ते खरेदी करत असतात. रस्त्याच्या बाजूच्या जागा एकतर अतिक्रमण झालेले आहेत. तर दुसरीकडे खड्डे आहेत. त्यामुळे त्या गाड्या रस्त्यावरच उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची बाजूची जागा रुंद झाल्यास काही प्रमाणात हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेचे विस्तार झाल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या पलीकडील परिसर अद्याप विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या परिसरात नागरी वस्ती वाढताना दिसत नाही. या परिसरात रस्ते, पाणी, दिवाबत्ती याचे नियोजनबद्ध काम केल्यास या परिसराचा विकास होऊ शकतो. लिंगायत जंगम, लिंगायत गुरव, लिंगायत वाणी यासह लिंगायत समाज राहत असून या समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या परंपरेनुसार त्याला दफन करण्यासाठी रोहा शहरात जागा नाही. लिंगायत समाजासाठी दफनभूमी नाही. त्यामुळे या समाजाला मोठी अडचण होत असते. या समाजासाठी दफभूमीची आवश्यकता आहे.
काही ठिकाणी अंतर्गत रस्ते हे निकृष्ट दर्जाचे आहेत. ते नव्याने करण्याची आवश्यकता आहे. अथवा त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. गेले कित्येक वर्ष निवडणूक झाल्या का रस्ते होतील असे बोलले जात होते. आता तर निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे नव्या शिलेदारांना आपापल्या प्रभागातील रस्ते चांगले करण्याची संधी आहे.
गेली कित्येक वर्ष रोहा शहरातील गटाराचा प्रश्न प्रामुख्याने पुढे येत असल्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येते. काही ठिकाणी तर गटारे नाहीत रोहा कोलाड मार्गावर तर काही ठिकाणी गटारे नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत असते. हा गटाराचा प्रश्न कायमस्वरूपी भेडसावत आहे. अंडरग्राउंड गटाराचं काय झालं हे माहित आहे आता पुन्हा एकदा नव्याने अंडरग्राउंड गटार होत आहे याचं काम चांगल्या पद्धतीने झाल्यास पावसाळ्यात ही समस्या निर्माण होणार नाही. शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे होती. मात्र, जसजशा इमारती उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी झाडे ही तोडण्यात आली. त्या बिल्डर आणि पर्यायी झाडे कुठेच लावले गेल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढलेला असतो.
शहरातील वापरत नसलेल्या ठिकाणी झाडे लावण्याची आवश्यकता आहे.सुंदर रोहा चे स्वप्न पाहण्याचे सांगितले जाते त्यामध्ये ही बाब अंतर्भूत गोष्ट आहे. यासह अनेक छोट्या मोठ्या समस्या भेडसावत असतात बारकाईने लक्ष घालून या समस्या सोडवल्यास विकास होणार आहे. खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा शहराला आकार देत असताना काही मूलभूत प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. व शहराच्या विकास करण्यासाठी खा. सुनील तटकरे, मंत्री आदिती व माजी आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून निधी येत असतो. त्या निधीचा योग्य रित्या काम करून विकास काम करण्याची आवश्यकता आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. त्यांनीही विकासासाठी आपल्या वरिष्ठांकडून निधी आणण्याची आवश्यकता आहे.
वाहतूककोंडी जटिल प्रश्न
रोहा शहरात ठिकठिकाणी होत असलेली वाहतूककोंडी हा एक जटिल प्रश्न आहे. वाहतूक कोंडी प्रामुख्याने रोहा - कोलाड मार्गावरील प्रामुख्याने एसटी स्टँड, वीर सावरकर मार्ग, आडवी बाजारपेठ, रोहा शहरातील नगर परिषदसमोर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते हा प्रश्न नव्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक कशा पद्धतीने सोडवतात हे पाहावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे कारखान्यातील बसेस बाजारात आल्यावर व ट्रान्सपोर्ट च्या गाड्या बाजारात आल्यावर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असतो.
वाढत्या फेरीवाल्यांना शिस्त गरजेची
रोहा शहरात फेरीवाले वाढल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे. या फेरीवाल्यांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फळ विक्रेत्यासह अन्य फेरीवाले ठीक ठिकाणी गाडी उभी करून व्यवसाय करत असतात. त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.