महाड न.प. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी pudhari photo
रायगड

Mahad municipal election : महाड न.प. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप युती संघर्ष टिपेला; विभागातील जाहीर सभा, रॅलीने महाड शहर गजबजले

पुढारी वृत्तसेवा

महाड : महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रमुख स्पर्धक असलेले शिवसेना व विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरांच्या विविध भागात आता जाहीर सभांचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला असून या निमित्ताने निघालेल्या रॅली व गाठीभेटीमुळे महाड शहर गजबजुन केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या निवडणुकीसाठी औपचारिकतेचा भाग म्हणून 27 नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मात्र या निवडणुकीत अपक्षांची असलेली संख्या पाहता अन्य पक्षांना प्रचारा कामी मुबलक अवधी प्राप्त झाल्याचे दिसून येते.

शहराच्या प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या वतीने शहरांच्या विविध भागातील मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटी घेण्यास मागील आठवड्यापासूनच प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज यांची छाननीय व निश्चिती झाल्यानंतर निश्चिंत झालेल्या या निवडणुकीतील उमेदवारांनी आता आपल्या कार्यकर्त्यांसह मतदार राजाकडे जाऊन त्यांची आळवणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

150 वर्षापेक्षा जास्त वर्षे झालेल्या या क वर्ग महाड नगर परिषदेमध्ये आगामी पाच वर्षांसाठी निवडून द्यावयाच्या 20 उमेदवारांकरता सुमारे 23 हजार 124 मतदार मतदान करणार आहेत यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या मतदानावरच निवडणुकीतील विजय निश्चित होईल हे लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या युवा आघाडीकडून या बाबी अधिक अधोरेखित केले जात असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहा नंतर या गाठीभेटी सुरू होत असून रात्री साडेसात पर्यंत त्या सुरू राहत आहेत त्यानंतर एखाद्या विभागात जाहीर सभा व त्या पश्चात गाठीभेटी नंतर 10 वाजता प्रचार यंत्रणा थांबवली जात असल्याचे विविध भागांतील मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

शहराच्या विविध भागात आता राजकीय पक्षांच्या फेऱ्या वाढू लागल्याने स्थानिक नागरिकांचे असलेले प्रश्न व मागील पाच वर्षात त्यांच्याकडे संबंधित काळातील लोकप्रतिनिधीत कडून केली गेलेली पाठराखण अथवा केलेले दुर्लक्ष याचा लेखाजोखा स्पष्ट भाषेत जनतेकडून संबंधित पक्षाला ऐकवीला जात असल्याचे सांगण्यात येते.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांची महाडमध्ये सभा घेतली जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपच्या वतीने देखील शहरांच्या विविध भागात आपला प्रचार सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पक्षाच्या जाहीर सभेसाठी देखील खासदार सुनील तटकरे यांसह मंत्री ना आदिती ताई तटकरे,माजी आमदार अनिकेत भाई तटकरे आदि मान्यवरासह उपस्थित राहतील अशी माहिती प्राप्त झाली आहे.

19 शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुका सर्वांना महाडकर नागरिक व परिसरातील नागरिकांसाठी दिशादर्शक ठरणार असून शहराच्या विविध भागात सुरू झालेल्या प्रार्थमिक गाठीभेटी राहिली व विभागीय बैठकांमुळे आता वातावरण तापू लागले असून या निवडणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन देखील सिद्ध असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

  • आगामी दोन दिवसांमध्ये चिन्हांचे वाटप झाल्यानंतर शहराच्या मुख्य भागांमधील असणाऱ्या प्रमुख वाक्यांच्या उपस्थित जाहीर सभेचे आयोजन शेवटच्या दोन दिवसात म्हणजे 29 व 30 रोजी होण्याची शक्यता या दोन्ही पक्षांच्या संयोजकांकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT