Mahad historical heritage Pudhari
रायगड

Mahad historical heritage: ऐतिहासिक मैलांच्या दगडांचे जतन आवश्यक; इतिहास संशोधकांची मागणी

महाडसह भोर परिसरात अनेक शिळा

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: शिवकालीन काळापासून महाड शहराचा असलेला उल्लेख व त्या पक्षात ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीनेे शहराची असलेली ओळख लक्षात घेता या शहरांमध्ये हुतात्मा वसंत दाते चौकात असलेली ऐतिहासिक मैलांच्या दगडासह वरंध हिरडोशी व लोणंद येथील अशाच पद्धतीच्या शिल्पांचे अस्तित्व शासनाने जपणे आवश्यक असल्याचे मत महाड येथील सह्याद्रीगिरी भ्रमण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल वारंगे व इतिहास संशोधक डॉक्टर.अंजय धनावडे यांनी व्यक्त केले आहे.

अतिशय प्राचीन बंदर म्हणून महाडचा उल्लेख तत्कालीन कागदपत्र तथा प्रवास वर्णनांमध्ये आढळतो. दासगाव व महाड बंदरातून वरंधा तथा आत्ताचा आंबेनळी ज्याला ब्रिटिश काळात फिट्झ गेरॉल्ड घाट म्हणत या दोन्ही घाटातून दख्खनच्या पठारावरील बाजारपेठांमध्ये माल पोहोचवला जायचा.

या व्यापाराला जवळजवळ 2000 वर्षांचा इतिहास आहे .याच कालावधीमध्ये प्रसिद्ध गांधार पाल्याची ची तथा कोलची लेणी खोदली गेली. ब्रिटिश काळात देखील या मार्गावरून मालाची ने आण होत असे. 1882 च्या सुमारास महाडला 500 ते 50000 रुपये वैयक्तिक भांडवलधारक असे 100 गुजराती मारवाडी व भाटिया व्यापारी होते येथून तांदूळ नाचणी वरीची निर्यात होई.

महाडला दख्खनच्या जिल्ह्यांमधून कापड, धान्य, हरभरा, गुळ ,मिरची, तेल ,तंबाखू, कांदा, लसूण, चिंच, लोणी , भुईमूग ,धणे तथा घोंगड्यांची आयात होत असे .याबरोबर इतरही माल सह्याद्री पलीकडून महाडला यायचा मग घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जायचा.

सन 1881 मध्ये महाड होऊन वरंधा घाटातून दरवर्षी 1,54000 रुपये किमतीचे सामान भोर व फलटण संस्थान तसेच पुण्यात पाठवली जात असे. महाडला ह्या घाटातून सालीना 70,000 रुपये किमतीचा गहू ,हरभरा ,बाजरी ,ज्वारी ,मीठ ,कांदा व इतर पदार्थ बाजारपेठेत येत .

सध्याच्या महाडच्या मुख्य बाजारपेठेत अर्थात महात्मा गांधी मार्गावर असलेला ब्रिटिश कालीन मैलाचा दगड गटारामध्ये पडून आहे.

घाटाचे सध्या नूतनीकरण चालू आहे या दोन्ही ऐतिहासिक मैलाच्या दगडांचे सन्मानपूर्वक त्या जागेवर पुनर्स्थापना करणे शासनाकडून आवश्यक असून महाड शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीदरम्यान नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या चौकातील या ऐतिहासिक दगडाचे पुनर स्थापन करावे तसेच अन्य ठिकाणी देखील त्यांचे योग्य जतन करावे अशी मागणी डॉक्टर राहुल वारंगे व डॉक्टर अंजय धनवडे यांनी शासनाकडे केली आहे.

ब्रिटीशकालीन महामार्ग

या मार्गावर हा दगड असणे हा मार्ग ब्रिटीशकाळात महामार्ग असल्याचे सूचित करतो.असाच एक मैलाचा दगड आजही वरंधा घाटात वाघजाई मंदिरापुढे पवार हॉटेलच्या अगोदर डाव्या हाताला आहे. या ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडावरत्यावर लोणंद, हिरडोशी, महाड, वरंध ही अंतरे मैलांमध्ये लिहिलेली आहेत हा सुद्धा अर्धा मातीत काढलेल्या अवस्थेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT