Holi Special Trains 2026  Pudhari
रायगड

Holi Speacial Trains 2026: कोकणच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे कडून दिलासा, चालवणार २० अतिरिक्त विशेष गाड्या

दिवा - चिपळूण - दिवा अनारक्षित विशेष (१६ सेवा) चालवण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

रोहे महादेव सरसंबे

मध्य रेल्वे द्वारे येत्या होळी सणात प्रवाशांच्या सोयीसाठी २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा) चालवण्यात येणार आहे यामध्ये ट्रेन क्रमांक 01003 साप्ताहिक विशेष दिनांक ०२.०३.२०२६ आणि ०९.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगांव येथे २२.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

ट्रेन क्रमांक 01004 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०१.०३.२०२६ आणि ०८.०३.२०२६ रोजी दर रविवारी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले.

विशेष ट्रेन क्रमांक 01003 साठी बुकिंग दिनांक २८.०२.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होणार आहे.

दिवा - चिपळूण - दिवा अनारक्षित विशेष (१६ सेवा) चालवण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष दिनांक ०१.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत दिवा येथून दररोज २३.२५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष दिनांक ०१.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत चिपळूण येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.

या गाडीला निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी हे थांबे देण्यात आले आहे.

या गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी सारखे सामान्य शुल्क आकारले जाईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

प्रवाशांना या विशेष सेवांचा लाभ घेण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT