Summer Special Train File Photo
रायगड

Summer Special Train: रेल्वे चालवणार 34 अतिरिक्त उन्हाळी साप्ताहिक विशेष सेवा

एलटीटी, मुंबई-सुलतानपूर वाराणसीदरम्यान मेपासून विशेष लोकल

पुढारी वृत्तसेवा

रोहे: उन्हाळ्याच्या हंगामामध्ये प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर-वाराणसीदरम्यान 34 अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-सुलतानपूर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (18 सेवा) गाडी क्रमांक 04211 ही साप्ताहिक विशेष 21 मे ते 16 जुलैपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 14:35 वाजता सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी 23 वाजता पोहोचेल (9 सेवा) गाडी क्रमांक 04212 साप्ताहिक विशेष दि.20 मे ते 15 जुलैपर्यंत दर बुधवारी सुलतानपूर येथून 4 वाजता सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 12:20 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ हे थांबे देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (16 सेवा) गाडी क्रमांक 04225 साप्ताहिक विशेष 22 मे रोजी ते 10 जुलै 2026 पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 14:35 वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी 02:05 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 04226 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 21 फेबु्रवारी ते 9 जुलैपर्यंत दर गुरुवारी वाराणसी येथून 01:35 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 12:20 वाजता पोहोचेल.

गाडीचे थांबे...

या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी हे थांबे देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT