खांब : श्याम लोखंडे
इराण इस्रायल युद्धामुळे हकाती देशातून होणारा गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिकांवर तसेच घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे काळ्या बाजारात गॅस आवाच्या सव्वा किमतीने विकला जात असल्याचेबोलले जात आहे.
गॅस महाग व दुर्मिळ झाले. रेशनवर मिळणारे तसेच काही किराणा मालाच्या दुकानावर मिळणारे केरोसिन या आधीच गेली अनेक वर्षे हद्दपार झाले त्या पाठोपाठ स्टोव देखील त्याचे खप नसल्याने बाजारातून गायब झाले त्यामुळे शहरातील वस्तीधारक आणि मोल मजुरी करणारे इतर प्रांतांतून आलेले नागरिक यांच्यावर गॅस सिलेंडचा तुटवडा मुळे संकट तसेच उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी चुलीचा किंवा लाकडाचा वापर तर हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे.तर ग्रामीण भागात उज्वला योजनेअंतर्गत लाखो गरीब महिलांना मोफत/सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन दिले गेले आहेत, त्यामुळे गाव ठिकाणी मोळी लाकडांची देखील कमतरता भासली आहे. त्यामुळे लाकडांची मागणी सुरू होत आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा, रिफिलच्या वेळेत वाढ आणि काळाबाजार यामुळे अनेक कुटुंबांना सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे.
केंद्र सरकारने व्यावसायिक (हॉटेल, उद्योग) वापराचा गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मजूर, हॉटेल व्यवसाय, छोटे उद्योजक इत्यादींवर थेट आर्थिक फटका बसत आहे. केरोसिन बंद झालेल्या किराणा दुकानात पाच किलो वजनाचे कमर्शिअल पद्धतीने मोल मजूर करणाऱ्या नागरिकांना ही व्यवस्था सहजपणे सुरू झाली मात्र ते आजच्या संकटात पूर्ण गायब झाल्याने या साऱ्या मोल मजूर करणारे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर मोठी टांगती तलवार उभी राहिली असून त्यांच्यावर सिलेंडर गॅस अभावी उपास मारीची वेळ आली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
उज्वला योजनेअंतर्गत लाखो गरीब महिलांना मोफत/सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन दिले आहे, पण त्याच वेळी एलपीजी गॅसचा तुटवडा, रिफिलच्या वेळेत वाढ आणि काळाबाजार यामुळे अनेक कुटुंबांना सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे.
केंद्र सरकारने व्यावसायिक (हॉटेल, उद्योग) वापराचा गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मजूर, हॉटेल व्यवसाय, छोटे उद्योजक इत्यादींवर थेट आर्थिक फटका बसतोय.
परराज्यातून आलेले व भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मजूरांना उपास मारण्याची वेळ तरजिथे छोटे हॉटेल, नाश्ता बेंच, चायवडा गाड्या, दुकानात दुपारचं जेवण टपरी अशा सेवा असतात त्यांच्यावर गॅसचा तुटवडा अत्यंत वाईट परिणाम करतो. गॅस सिलेंडर नसल्याने शेकडो छोटे व्यवसाय बंद पडतात किंवा खीळून जातात.
लाकडी चुलीच्या जागी आता गॅस स्टोव म्हणजे एलपीजी () सिलेंडर आणि त्यावर चालणारे स्टोव/इंडक्शन स्टोव जास्त वापरात आहेत. गॅस व पेट्रोलियम इंधनावर जागतिक तणाव (मध्य पूर्व, इरानइस्राएल टक्कर) आणि गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लोक गॅसच्या पर्यायासाठी इंडक्शन स्टोवकडे वळत आहेत. त्याच बाजारात इंडक्शन स्टोवची मागणी एकदम वाढल्यानं अनेक शहरांत त्यांचा स्टॉक संपला आहे, म्हणजेच बाजारातून प्रत्यक्ष इंडक्शन/स्टोव गायब झाले असून ऐनवेळी स्टोव बाजारात उपलब्ध करण्यासाठी दुकान व्यावसायिकांच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी त्याची ग्राहकाला परवडेल अशी किंमत असेल का यावर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.सुधीर झगडे, व्यवस्थापक,शुभम गॅस एजन्सी, कोलाड
इराण इस्रायल युद्धामुळे हे संकट ओढवले आहे. यामुळे भारताचा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार अधिक प्रयत्न करत आहे. हॉटेल्स,व्यावसायिकांवर बंधन आहेत मात्र त्यावर देखील नियंत्रण होत आहे. घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग नुसार वेळेवर मिळत आहे त्याची बुकिंग नंबर आणि त्यावर मोबाईल वर असलेले ओटीपी नंबर हे ऑनलाईनसाठी बंधनकारक आहे.मात्र काही ठिकाणी एक सिलेंडर असल्याने त्यांची अधिकची अडचण होत आहे त्यावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आहेत. आधीच गॅसची कमतरता भासत आहे त्यामुळे सरकारकडून दिलेल्या नियमांच पालन आणि अंमलबजावणी केली जात आहे त्याला ग्राहकांनी सहकार्य करावे.सुधीर झगडे, व्यवस्थापक,शुभम गॅस एजन्सी, कोलाड