रेवदंडा : महेंद्र खैरे
पोर्तुगिजकालीन कोर्लई किल्ला पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. मुरूड पर्यटनात पर्यटक कोर्लई पहाण्यासाठी हमखास भेट देतो, परंतु पर्यटकांना खुणावणारा कोर्लई किल्लात पर्यटकांना सुविधाच्या अभाव आढळत असून पुरातत्व खात्याचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
मुरूड तालुका पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले असून मिनी गोवा म्हणून संबोधले जाते, निसर्गरम्य परिसर, सुंदर स्वच्छ समुद्र किनारा, तसेच लगतच फणसाड अभयारण्य यामुळे पर्यटक मुरूड तालुका पर्यटनासाठी भेटी देतात. तसेच साळाव या मुरूडच्या प्रवेशव्दारानजीक दोन किमी अंतरावर असलेला पोतुगिजकालीन कोर्लई किल्ला सुध्दा पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
तीन बाजूस समुद्र असलेल्या व चौफेर नजर ठेवण्यास उपयुक्त असा हा ऐतिहासिक पोर्तुगिज बनावटीचा किल्ला पहाण्यास नित्याने असंख्य पर्यटक येथे येत असतात. परंतु कोर्लई किल्लात प्रारंभी जाण्यासाठी मार्गफलक फलकांचा अभाव असल्याने पर्यटकांना रस्ता किल्लात जाण्याकडे रस्ता शोधवा लागतो. किल्लात जाण्यासाठी एक दोन मार्ग उपलब्ध आहेत.
किल्ल्या नजीक जाताना, गाईड उपलब्ध नसल्याने किल्ल्यात कोठून प्रवेश करावा, हा प्रश्न पर्यटकांना निर्माण होतो. नादुस्त असल्याने अवघड बनला आहे, तर दुसऱ्या बाजूकडून जाताना झाडीझुडूपातून रस्ता शोधत पर्यटक व किल्लाप्रेमी मंडळीना मार्गक्रमण करावा लागतो.
पुरातत्व खात्यास निवेदन
किल्लावरील गैरसोयींबाबत कोर्लई ग्रामपंचायत सरपंच राजश्री प्रशांत मिसाळ यांनी पुरातत्व खात्यास लेखी निवेदन दिले असून किल्ल्यावर साफसफाई करीता कर्मचारीवर्ग वाढविणे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, किल्ल्याकडे जा-येसाठी असलेल्या रस्त्याची दुरूस्ती तसेच मार्गफलक लावणे आदीबाबत मागणी यामध्ये केली आहे.