कोकणातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत pudhari photo
रायगड

Konkan crop damage : कोकणातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीमुळे कोकणात भातपिकांचे नुकसान; शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

पोयनाड : विजय चवरकर

मराठवाडा विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली. पिकांचे बागांचे नुकसान झाले. काही जिल्ह्यात 100% तर काही जिल्ह्यात 50 ते 70 टक्के नुकसान झाले. काही जिल्ह्यात जमिनी खरडून गेल्या. या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने भरीव मदत जाहीर केली. कोकणातही अतिवृष्टीमुळे भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील भात पीक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळाली पाहिजे हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारने कोकणातील शेतकर्‍याला गृहीत धरले नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे अतिवृष्टीमुळे कोकणात भात पिकांचे नुकसान झाले आहे कापणीस आलेली पिके भात खाचरातील पाण्यामध्ये आडवी पडली आहेत. काही शेतकर्‍या ंनी भाताचा एकही दाणा मिळणार नाही इतके नुकसान झाले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांमध्ये भात पीक असे आहे ज्यामध्ये शेतकर्‍यांचे पदरचे पैसे खर्च पडतात कोकणात भात का भात पिकविणार्‍या शेतकर्‍यांची अशीच अवस्था आहे.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक त्यामुळे अतिवृष्टीमुळे भाकरी कांचन नुकसान झाले. या शेतकर्‍याला आर्थिक मदत मिळाली नाही तर तो शेतकरी पुढील हंगामात भात पीक घेणार नाही. कोकणातील भात शेतीपासून शेतकरी दूर जात आहे. नुकसान भरपाई मिळाली नाही तर तो अधिक दूर जाईल.

विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने भरपाईचे 31 हजार 628 कोटींचे भरीव पॅकेज जाहीर केले आहे. त्यात 352 तालुक्यातील सात लाख शेतकर्‍यांचा समावेश आहे. विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदत मिळाली आनंद आहे.

गेली काही वर्षे आंबा पिकांचे नुकसान होत आहे याविषयी खासदार आमदार नेते सत्याधारी असो वा विरोधी कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही. भागविका नंतर कोकणात आंबा पीक नंतर दोन नंबरचे पीक आहे. अलिबाग तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत मध्ये उन्हाळी भात पीक घेतले जाते. अंदाजे 100 एकर वर भात पीक घेतले जाते. यावर्षी मे च्या 15 तारखेला पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेगावमधील शेतकर्‍यांचे भात पीक पावसात भिजल्यामुळे वाया गेले याला नुकसान भरपाई मिळाली नाहीत.

  • एकंदरीत पाहता कोकणातील शेतकरी राज्य सरकारच्या गणतीत नाही असेच चित्र पाहायला मिळते. छायाचित्र दिसणारे भात खाचरे कोणाळ ग्रा.पं.मधील आहेत. सुरेश धर्माजी पाटील व रवींद्र पाटील शेतकर्‍यांनी मेहनतीने भात पीक लावले पण परतीच्या पावसाने भात पीक जमीन दोस्त केले असेच नुकसान अनेक शेतकर्‍यांचे झाले आहेत त्यामुळे राज्य सरकारने कोकणातील भात पीक नुकसानग्रस्त शेतकर्‍याला भरीव मदत करावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. कोकणातील खा. आमदारांना याविषयी आवाज उठवावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT